जुनी पेन्शन हक्क संघटनेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:17+5:302021-05-10T04:30:17+5:30

बैठकीत संघटनेच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. संघटनेने एनपीएस खात्यांवर पूर्णतः बहिष्कार टाकावा, असे ठरले. विविध विभागांमध्ये संघटनेच्या ध्येय ...

Meeting of the Old Pension Rights Association | जुनी पेन्शन हक्क संघटनेची बैठक

जुनी पेन्शन हक्क संघटनेची बैठक

बैठकीत संघटनेच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. संघटनेने एनपीएस खात्यांवर पूर्णतः बहिष्कार टाकावा, असे ठरले. विविध विभागांमध्ये संघटनेच्या ध्येय धोरणांचा प्रसार व्हावा व आपल्या हक्काची १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना किती फायदेशीर आहे हे सर्व विभागांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कळावे या उद्देशाने प्रत्येक विभागाचा एक प्रतिनिधी विभाग प्रमुख म्हणून निवडला जातो. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यामधून डॉ. मंगेश वाघमारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

या बैठकीला राज्य समन्वयक राहुल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी, गजानन मराठे, चंद्रकांत वाघ, चुडामण सरगर, प्रमोद राजपूत, सरचिटणीस तुषार सोनवणे, कार्याध्यक्ष अशोक बागले, कोषाध्यक्ष संदीप रोकडे, तालुकाध्यक्ष आदिनाथ गोल्हार, प्रवीण परदेशी, दयानंद जाधव, पंकज होडगर, धीरसिंग वसावे, प्रवीण मासुळे, वाघंबर कदम, ज्ञानोबा सुरनर, कमलेश राजपूत, यशवंत सूर्यवंशी, आबासाहेब अहिरे, तुकाराम अलट, सुनील पगारे, विशाल सिसोदे, प्रशांत बागूल, अनिल चिकटे, उपेंद्र पाटील, अविनाश डोंगर, कमलेश पाटील, धीरज खैरनार, रवींद्र पाटील, पंकज निकुंभे, दीपक ठाकरे आदींनी चर्चेत सहभाग नोंदवला, अशी माहिती संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश पाटील यांनी दिली.

Web Title: Meeting of the Old Pension Rights Association