भुलाणे येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची बैठक (टिप- बातमीत एक वाक्य बोल्ड केलं आहे. फॉन्ट मिस झाला आहे, त्यामुळे वाचता येत नाही. कृपया पाहणे.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:06+5:302021-05-26T04:31:06+5:30

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषिसेवक अर्जुन पावरा यांनी ‘एक गाव-एक वाण’ मोहिमेबाबत उपस्थित शेतकरी बांधवांना बोली भाषेत माहिती ...

Meeting of farmers at Bhulane through the Department of Agriculture | भुलाणे येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची बैठक (टिप- बातमीत एक वाक्य बोल्ड केलं आहे. फॉन्ट मिस झाला आहे, त्यामुळे वाचता येत नाही. कृपया पाहणे.)

भुलाणे येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची बैठक (टिप- बातमीत एक वाक्य बोल्ड केलं आहे. फॉन्ट मिस झाला आहे, त्यामुळे वाचता येत नाही. कृपया पाहणे.)

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषिसेवक अर्जुन पावरा यांनी ‘एक गाव-एक वाण’ मोहिमेबाबत उपस्थित शेतकरी बांधवांना बोली भाषेत माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल यांनी सादर केली. तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी ‘एक गाव-एक वाण’बाबत मोहिमेबाबत माहिती देताना या मोहिमेचे स्वरूप समजावून सांगताना, कापूस पिकाच्या विविध वाणांपैकी ‘एक गाव-एक वाण’ मोहिमेत निवडलेल्या वाणाविषयी माहिती देऊन, कापूस पिकाची बीजप्रक्रिया, समूह लागवड, आंतर पीक, सापळा पीक, खताचे नियोजन करताना जमीन सुपीकता निर्देशांकाचा वापर करून खताची १०% बचत करणे, एकात्मिक कीड-रोग नियंत्रणात फेराॕमन ट्रॕपचा वापर, गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण, कापूस स्वच्छ वेचणीवर सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे, तसेच समस्यांचे चर्चात्मक निराकरण करण्याचा प्रयत्न केला. मंडळ कृषी अधिकारी राहुल धनगर यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणीचे महत्त्व समजावून सांगितले. ग्रामस्थांतर्फे बाबुलाल पावरा, संजय ठाकरे व इतर शेतकऱ्यांनी आपले मत मांडले. भुलाणेचे सरपंच शांताराम खर्डे यांनी ग्रामस्थांना ‘एक गाव-एक वाण’ मोहिमेत सक्रियतेने सहभागी होण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमात शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या इतर विविध योजनांविषयी कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी कृषिसेवक यांनी आभार मानले.

Web Title: Meeting of farmers at Bhulane through the Department of Agriculture