शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बाजार पेठेची वेळ सात ते पाच करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील बाजारपेठेची वेळ सर्वसामान्यांसाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ववत करण्याचा निर्णय आमदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील बाजारपेठेची वेळ सर्वसामान्यांसाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ववत करण्याचा निर्णय आमदार शिरिष नाईक यांच्या उपस्थितीत आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत घेण्यात आला.शहरातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल ३ जुलैला पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाकडून दोन दिवस शहर बंद ठेवण्यात आले. दरम्यान सोमवार पासून बाजारपेठेची वेळ दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात आली होती. सोमवारपासून व्यवहार सुरळीत सुरू झाले. दडी मारलेला पाऊस गेल्या तीन दिवसापासून सुरू झाल्याने शेतीपयोगी साहित्य घेण्यासाठी शेतकरी शहरात येताहेत. सलग दोन दिवस बाजार बंद केल्याने सोमवारी बाजारात एकच गर्दी झाली. या वेळी कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याची स्थिती होती.कोरोना बाधित वृध्दा गेल्या दहा दिवसापासून नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. बाजारपेठेची वेळ कमी केल्याने शहरात गर्दी होणारच या मताशी व्यापारी व नागरीक सहमत असल्याची भावना आमदार शिरीष नाईक यांच्याकडे व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभुमीवर त्यांनी पालिकेच्या बहुउद्देशिय सभागृहात बैठक घेतली. बैठकीत तहसीलदार सुनीता जºहाड, नगराध्यक्षा हेमलता पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरीया, मुख्याधिकरी राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, पालिकेचे गटनेता आशिष मावची, विरोधी पक्ष गटनेता नरेंद्र नगराळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी तथा नगरसेवक उपस्थित होते.कोरोना संसर्गाचा सारासार विचार करून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बाजारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय आमदार नाईक यांनी घेतला. त्यांच्या सुचनांवर अंमल करण्यासाठी प्रशासन आपल्या आधीच्या निर्णयात बदल करून बाजारपेठेची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच अशी करीत असल्याचे तहसलीदार सुनीता जºहाड यांनी सांगितले.बैठकीत पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागात स्वयंसेवक नेमण्यात येत असून, त्यांना आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती दिली. कोरोनापासून कसा बचाव करावा याबाबत स्वयंसेवक प्रभागनिहाय जनजागृती करतील असे ते म्हणाले.दरम्यान, मंगलदास पार्क मधील कोरोना बाधित वृद्धेच्या संपर्कातील सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी सोमवारी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. शहरातील जनता पार्क परिसरातील ५५ वर्षीय पुरूष नंदुरबार येथे उपचार घेत असून, त्यांनाही कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसून येत असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याची व त्यांच्या संपर्कातील परिवाराच्या सदस्यांना होम क्वॉरंटाईन केले असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे तसेच आवश्यक काम असल्याशिवार घराबाहेर पडू नये असे आवाहन आमदार शिरीष नाईक यांनी केले.