शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आधार मिळण्यासाठी ‘मानसमैत्र’ हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : कोरोना या विश्वव्यापी साथरोगाचे सध्या थैमान सुरू आहे. अनअपेक्षितपणे उद्भवलेल्या संकटामुळे अनामिक भिती, चिंता ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : कोरोना या विश्वव्यापी साथरोगाचे सध्या थैमान सुरू आहे. अनअपेक्षितपणे उद्भवलेल्या संकटामुळे अनामिक भिती, चिंता आणि ताण वाढतो आहे. तसेच भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेतून मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यताही असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानस मैत्र ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे घरातच कोंडले गेल्यासारखी स्थिती असल्याने चिंता, अस्वस्थता, कुटूंबियांची काळजी, ताण, भविष्याच्या अनिश्चिततेमुळे आणि पुढील काळातील रोजगार, उद्योग व्यवसाय, आर्थिक मंदी या सारख्या प्रश्नांमुळे अनामिक भिती, दडपण येणे या सारख्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा स्वरूपाच्या मानसिक अवस्थेचे पुढे गंभिर आजारात रूपांतर होऊ शकते. पण या वेळी अशा व्यक्तींना आवश्यक भावनिक आधार व धीर मिळाला तर त्यांना स्थितीतून बाहेर यायला मदत होऊ शकते. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानस मित्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ आणि महाराष्ट्र अंनिसच्या मानसिक आरोग्य विभागाचे कार्यवाह डॉ.प्रदीप जोशी (जळगांव) हे या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ८० मानस मित्र-मैत्रिणी या हेल्पलाईनमध्ये काम करीत असून, खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्र आणि ठाणे-मुंबई-कोकण अशा पाच विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे. खान्देश विभागात अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, शहादा, जि.नंदुरबार हे या हेल्पलाईनचे समन्वय आहेत. त्या-त्या विभागातील हेल्पलाईनसाठी मानस मित्र मैत्रिणींचे मोबाईल नंबर समाजमाध्यमांद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. तरी गरजुंनी या हेल्पलाईनचा अवश्य लाभ घ्यावा असे, आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानसिक आरोग्य विभाग हा स्वतंत्र विभाग कार्य करतो. कोरोना व लॉकडाऊनमुळे लोक तणावाखाली आहेत. अशा वेळी त्यांना बोलते करून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ.प्रदीप जोशी यांनी दिली.