ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 20:30 IST2020-01-08T13:05:39+5:302020-01-08T20:30:49+5:30
Nandurbar ZP Election 2020 : राज्य मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांनाही जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये मोठा धक्का बसला आहे.

ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत
नंदुरबार - नुकत्याच आटोपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीती मतमोजणी सुरू असून, या मतमोजणीमधून अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. राज्य मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांनाही जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये मोठा धक्का बसला आहे. के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे.
नंदुरबारमधील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेल्या के. सी. पाडवी यांना त्यांच्या तोरणमाळ या बालेकिल्ल्यामध्येच धक्का बसला आहे. तोरणमाळ जिल्हा परिषद गटामध्ये पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा पराभव झाला आहे. शिवसेना उमेदवार गणेश पराडगे यांनी हेमलता पाडवी यांना पराभूत केले आहे.
पाडवींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतविभागणी होऊन त्याचा फायदा शिवसेना उमेदवाराला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra Cabinet Expansion : राज्यपाल कोश्यारी संतापले; काँग्रेस नेत्याला पुन्हा घ्यायला लावली शपथ
ZP Election 2020: धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागांवर विजय
Maharashtra Zilla Parishad Result Live: धुळ्यात भाजपाची सरशी पण नागपुरात नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळेंना धक्का!
मात्र असे असले तरी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तर भाजपा दुसऱ्या आणि शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे.