Maharashtra Zilla Parishad Result Live: नागपूरमध्ये काँग्रेस, धुळ्यात भाजप तर अकोल्यात वंचितची बाजी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 11:36 AM2020-01-08T11:36:33+5:302020-01-08T19:26:50+5:30

Maharashtra ZP (Zilla Parishad) Election Result 2020 in Marathi

Maharashtra Zilla Parishad Result Live: nagpur, akola, washim, nandurbar, palghar, dhule zp election in maharashta | Maharashtra Zilla Parishad Result Live: नागपूरमध्ये काँग्रेस, धुळ्यात भाजप तर अकोल्यात वंचितची बाजी

Maharashtra Zilla Parishad Result Live: नागपूरमध्ये काँग्रेस, धुळ्यात भाजप तर अकोल्यात वंचितची बाजी

Next

मुंबई : पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यापैकी नागपूरमध्ये काँग्रेस, धुळ्यात भाजपा आणि अकोल्यामध्ये वंचितने बाजी मारली आहे. तर पालघरमध्ये शिवसेना मोठा पक्ष ठरला आहे.

LIVE

Get Latest Updates

07:18 PM

धुळे जिल्हा परिषद अंतिम निकाल 

एकूण जागा 56
भाजप - 39
शिवसेना - 4
राष्ट्रवादी - 3
काँग्रेस - 7
इतर - 3

05:43 PM

अकोला जिल्हा परिषद अंतिम निकाल

एकूण जागा : 53 
निकाल घोषित - 53

भारिप-बमसं - 22
शिवसेना - 13
भाजप -  7
काँग्रेस -  4
राष्ट्रवादी - 3
अपक्ष - 4

05:29 PM

नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू निकाल, भाजपा-काँग्रेसला समसमान जागा 

नंदुरबार जिल्हा परिषद अंतिम निकाल 
एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 56
काँग्रेस 23
भाजपा 23
शिवसेना 7
राष्ट्रवादी 3

05:24 PM

वाशिम जिल्हा परिषद अंतिम निकाल 

एकूण जागा 52
भाजप - 07
शिवसेना - 7
राष्ट्रवादी - 10
काँग्रेस - 9
इतर - 19 

04:46 PM

जिल्हा परिषद नागपूर अंतिम निकाल

एकूण जागा- 58 
निकाल घोषित - 58


काँग्रेस- 30 

राष्ट्रवादी - 10

भाजप -15

शिवसेना -01

अपक्ष - 01

शेकाप - 01

04:46 PM

अकोला जिल्हा परिषद निकाल

एकूण जागा : 53 
निकाल घोषित - 52

भारिप-बमसं - 22
शिवसेना - 13
भाजप -  7
काँग्रेस -  4
राष्ट्रवादी - 3
अपक्ष - 3

04:43 PM

धुळे जिल्हा परिषद अंतिम निकाल 

एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 56
काँग्रेस 7
भाजपा  39
शिवसेना 4
राष्ट्रवादी 3
इतर 3 

04:34 PM

नंदुरबार जिल्हा परिषदेचा अंतिम निकाल

एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 56
काँग्रेस 23
भाजपा 23
शिवसेना 7
राष्ट्रवादी 3

03:25 PM

अकोला जिल्हा परिषद निकाल 

एकूण जागा : 53
जाहीर निकाल : 40
शिवसेना : 09
भारिप : 16
भाजप : 06
राष्ट्रवादी : 03
काँग्रेस : 02
अपक्ष : 04
 

02:43 PM

नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल

एकूण जागा 56
जाहीर झालेले निकाल 55
काँग्रेस 22
भाजपा 23
शिवसेना 7
राष्ट्रवादी 3
 

02:43 PM

पालघर जिल्हा परिषद अंतिम निकाल 

एकूण जागा : 57 
निकाल जाहीर : 57
शिवसेना : 18
माकपा: 6
भाजपा : 10
राष्ट्रवादी : 15 
बविआ: 04
मनसे:0
अपक्ष : 03
काँग्रेस : 1 
 

02:31 PM

नागपूर जिल्हा परिषद निकाल

काँग्रेस - २०

राष्ट्रवादी - ०७

भाजपा - ०७

शिवसेना - ०१

01:36 PM

नंदुरबार जिल्हा परिषद निकाल

एकूण जागा : 56
जाहीर झालेले निकाल : 35
काँग्रेस : 15
भाजपा : 12
शिवसेना : 05
राष्ट्रवादी : 03
 

01:25 PM

वाशिम जिल्हा परिषद निकाल

एकूण जागा 52
भाजप - 07
शिवसेना - 03
वंचित - 06
राष्ट्रवादी - 04
काँग्रेस - 04
अपक्ष - 02
जिल्हा जनविकास आघाडी - 06
 

01:16 PM

धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, 28 जागांवर आघाडी

धुळ्यात भाजपा एकहाती विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. 56 पैकी भाजपा 28 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 2, शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे. 
 

01:08 PM

अकोला जिल्हा परिषद निकाल

एकूण जागा - 53
भाजपा - 5
काँग्रेस - 2
शिवसेना - 5
राष्ट्रवादी -1
माकप -
वंचित - 5
आपक्ष- 2

01:05 PM

गृहमंत्र्यांचे चिरंजीव सलील देशमुख विजयी

नागपूर - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख विजयी, मेटपांजरा सर्कलमधून विजय, जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
 

01:02 PM

अकोला जिल्हा परिषद निकाल

भाजपा - 4
काँग्रेस - 1
शिवसेना - 4
राष्ट्रवादी -1
माकप -
वंचित - 2
जनविकास आघाडी -
आपक्ष-1
 

12:49 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का 

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत.
 

12:45 PM

शिंदखेडा पंचायत समितीवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवली

धुळे - शिंदखेडा तालुक्यात पंचायत समितीच्या 20 पैकी १५ गणात विजयी मिळवित भाजपाने पंचायत समितीवर एक हाती सत्ता मिळवत कमळ फुलविले. तालुक्यातील दाऊळ ,भडणे सेना,पाटण गणात काँग्रेस तर वारूळ गणात राष्ट्रवादी, असे आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाले आहे. तर बेटावद गणात अपक्ष उमेदवार विजयी झाला. तर हातनूर, विखरण, मालपूर,निमगूळ, मेथी, खरदे,धमाणे, विरदेल,होळ, नरडाणे, वालखेडा, खलाणे, चिमठाणे, शेवाडे, वर्षी अशा एकूण 15 गणात विजयी मिळवित पंचायत समितीत सत्ता काबीज केली आहे.

12:40 PM

पालघर जिल्हा परिषद निकाल 

एकूण जागा : 57 
निकाल जाहीर : 14
शिवसेना : 1
माकपा: 4
भाजप : 03
राष्ट्रवादी : 05
बविआ: 1
मनसे:0
 

12:40 PM

धुळे - तालुक्यात कापडणे गटातून भाजपचे बापु खलाणे विजयी.

12:27 PM

नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल

एकूण जागा 56

जाहीर झालेले निकाल 24

काँग्रेस  11

भाजपा 6

शिवसेना 4

राष्ट्रवादी 3

12:25 PM

धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागा मिळविल्या 

धुळे : जिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यात ५६ जागांपैकी २५ जागांचा निकाल हाती आला आहे. यात १९ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब लावला आहे.  

12:00 PM

नागपूर : जिल्हा परिषद येरखेडा सर्कलमधून भाजपाचे मोहन माकडे 158 मतांनी विजयी

12:00 PM

नितीन गडकरींना धक्का

नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धक्का; गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत.

11:59 AM

धुळे - साक्री तालुक्यातील दहिवेल गटात भाजप विजयी

11:54 AM

धुळे - शिरपूर तालुक्यात बोराडी गट व गणात भाजपचे उमेदवार विजयी

11:53 AM

धुळे - साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे गटात राष्ट्रवादीचे आणि बुरुडखे गटात काँग्रेस विजयी

11:51 AM

नागपूर जिल्हा परिषद - ५८ जागा

काँग्रेस - पाच विजयी 
राष्ट्रवादी- तीन विजयी 

आघाडीवर... 
काँग्रेस - चार आघाडीवर
राष्ट्रवादी - तीन आघाडीवर
शिवसेना - दोन आघाडीवर 
भाजप - चार आघाडीवर

11:44 AM

भाजपाच्या मंगला सुरेश पाटील विजयी 

धुळे - साक्री तालुक्यातील निजामपूर गटातून माजी जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांचे चिरंजीव भाजपाचे हर्षवर्धन दहिते आणि बळसाणे गटातून खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या वहिनी भाजपाच्या मंगला सुरेश पाटील विजयी झाले. जैताणे गटात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि दुसाणे गटात भाजपाचे बंडखोर अपक्ष पोपटराव सोनवणे विजयी.
 

11:43 AM

धुळ्यात भाजपाची बाजी

धुळे - शिरपूर तालुका सांगवी गट व गणात भाजपाचे उमेदवार विजयी झाले. सांगवी गट योगेश चैत्राम बादल(भाजपा), सांगवी गण (भाजपा), खंबाळे गण(भाजपा विजयी उमेदवार).
 

11:38 AM

भाजपाच्या योगिनी भारती विजयी

नंदुरबारः कोळदा गटातून भाजपाच्या योगिनी भारती विजयी झाल्या आहेत.

Web Title: Maharashtra Zilla Parishad Result Live: nagpur, akola, washim, nandurbar, palghar, dhule zp election in maharashta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.