सारंगखेडा येथे महाराणा प्रताप जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:36+5:302021-05-10T04:30:36+5:30

सारंगखेडा येथे बसथांब्याजवळील महाराणा प्रतापसिंह यांच्या फलकाशेजारी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच पृथ्वीराज रावल यांनी वीर शिरोमणी ...

Maharana Pratap Jayanti celebration at Sarangkheda | सारंगखेडा येथे महाराणा प्रताप जयंती साजरी

सारंगखेडा येथे महाराणा प्रताप जयंती साजरी

सारंगखेडा येथे बसथांब्याजवळील महाराणा प्रतापसिंह यांच्या फलकाशेजारी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच पृथ्वीराज रावल यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजपूत समाजातील तरुणांनीही महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन केले. सध्या देशात सर्वत्र कोरोना या महामारीने धुमाकूळ घातल्याने शासनाच्या नियमांना अधीन राहून मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीत यावर्षी महाराणा प्रताप यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी नितीन गिरासे, भूषण गिरासे, सागर राजपूत, राहुल गिरासे, अर्जुन रावल, अजय रावल, रवींद्र रावल, दिग्विजय रावल, ललित माळी, संग्राम रावल, सागर रावल, देवेंद्र गिरासे, पृथ्वीराज राजपूत, महेंद्र गिरासे आदी उपस्थित होते. अनेक समाजबांधवांनी आपल्या घरीच प्रतिमा पूजन करून या महान योद्धा व समाजाच्या आराध्य दैवतास अभिवादन केले.

Web Title: Maharana Pratap Jayanti celebration at Sarangkheda