शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे बैलबाजारांना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात चार ठिकाणी भरणाऱ्या बैलबाजारांना घरघर लागली आहे़ यातून बाजार समित्यांचे साधारण सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात चार ठिकाणी भरणाऱ्या बैलबाजारांना घरघर लागली आहे़ यातून बाजार समित्यांचे साधारण सहा लाख रुपयांचा सेस बुडाला असून दुर्गम भागातील पशुपालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे़ आठवडे बाजारांना परवानगी नसल्याने हे बैल बाजार पूर्णपणे बंद पडले आहेत़सर्वत्र यांत्रिकी शेतीचा प्रसार आणि प्रभाव वाढताना आहे़ यामुळे पशुंच्या आधाराने केली जाणारी शेतीपद्धती ही कालबाह्य होत आहे़ परंतू नंदुरबार जिल्ह्यात आजही पारंपरिक शेतीलाच प्राधान्य देण्यात येते़ यामुळे जिल्ह्यात तीन ठिकाणी पारंपरिक बैल बाजार भरवण्यात येतो़ यातून वर्षभरात साधारण २० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होवून पशुपालक, व्यापारी आणि बाजार समित्या यांचे अर्थकारण गतीमान होते़ परंतू २२ मार्चपासून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हे बैलबाजार बंद असून यातून उलाढालही थांबली आहे़ यात तळोदा येथील यात्रोत्सव रद्द झाल्याने त्याठिकाणी भरवला जाणारा बैल बाजार रद्द झाला आहे़ हा बैल बाजार महाराष्ट्र, गुजरात व राजस्थानातील बैल व्यापारी, शेतकरी यांच्या पसंतीचा आहे़ याठिकाणी दरवर्षी केवळ पाच दिवसात किमान २ हजार किंवा त्यापेक्षा अधिक बैलांची खरेदी-विक्रीचे व्यवहार होवून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय होत होता़ लॉकडाऊनमुळे हा यात्रोत्सव यंदा रद्द झाल्याने ही उलाढाल पूर्णपणे थांबली आहे़ नंदुरबार, मोलगी, तळोदा आणि विसरवाडी येथील बैलबाजारांची अवस्था गेल्या दोन महिन्यात बिकट झाली असून यामुळे आदिवासी पशुपालकांची आर्थिक कोंडी होवून नुकसान होत आहे़नंदुरबार बाजार समितीत मंगळवारी होणाºया आठवडे बाजारानिमित्त बैल बाजार भरवण्याची परंपरा आहे़ २२ मार्चपूर्वी बाजार समितीच्या आवारात शेवटचा बैल बाजार भरला होता़ लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर हा बाजार पूर्णपणे बंद होता़ आठवडे बाजार बंदीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश कायम असल्याने चालू महिन्यातही हा बाजार होवू शकला नाही़ वर्षभरात सरासरी चार कोटी रुपयांची उलाढाल होणाºया या बाजारात मे आणि जून महिना महत्त्वपूर्ण असतो़ खरीप हंगामापूर्वी याठिकाणी दर बाजाराला सरासरी ३५० बैलांची आवक होवून त्यातून ३०० बैल विक्री होतात़ अडीच महिन्यात ही विक्री थांबून बाजार समितीचा चार लाख रुपयांचा सेस बुडाला आहे़ याठिकाणी केवळ बैलच नव्हे तर शेळ्या, बोकड आणि कोंबड्याच्या खरेदी विक्रीतून आठवड्याला दीड लाख रुपयांची उलाढाल होत होती़ हा बाजारही थांबला आहे़सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावठी बैल हे गुजरात राज्यात सर्वाधिक पसंत केले जातात़ हे बैल नांगरटी तसेच शेतीकामांसाठी उपयुक्त मानले जात असल्याने या बैलांच्या खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी होते़ यादृष्टीने दुर्गम भागातील मोलगी येथे बैल बाजार भरवण्याची परंपरा अक्कलकुवा बाजार समितीने सुरु केली आहे़ बुधवारी भरणाºया या बाजारात १०० ते १५० बैलांची आवक होवून विक्री होते़ परंतू लॉकडाऊमुळे हा बाजार बंद आहे़ ग्रामपंचायतीच्या जागेत भरणाºया बाजाराला अद्यापही परवानगी नसल्याने अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़़४नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथेही बैल बाजार बंद असून याठिकाणी गुरुवारी २० ते २२ बैलांची आवक झाली होती़ यातून काही लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली़तळोदा येथे बाजार समितीतर्फे दर शुक्रवारी बाजार समितीच्या आवारातच बैलबाजार भरत असतो. येथील प्रशासनानेही तो दोन महिन्यांपासून बंद केला होता. काही दिवसातच खरीप हंगामाला सुरूवात होत आहे. साहजिकच शेतकºयांना पशुधनाची लागणारी आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पशुधनाची खरेदी विक्री पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या शुक्रवारी बाजार समितीच्या आवारात बैलबाजारात खरेदी-विक्री सुरू करण्यात आला होता़ परंतू याठिकाणी केवळ ४८ बैलांची विक्री होवून सहा लाख रुपयांची उलाढाल झाली़ ५५ बैलांची आवक झाल्याची माहिती आहे़ दर आवठड्याला साधारण ८०० ते एक हजार बैलांची आवक होत असते. या पशुधनाच्या खरेदी विक्रीतून बाजार समितीचा आतापावेतो प्रती बाजार एक टक्के याप्रमाणे चार लाख रूपयांचा महसूल बुडाल्याचेही म्हटले जात आहे.४तळोदा येथे कालिकामाता यात्रोत्सव आणि उन्हाळा यावेळी तीन ते पाच दिवसीय बैल बाजार स्वतंत्रपणे भरवला जातो़ यात गुजरात, राजस्थान तसेच धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील व्यापारी शेतकरी हे बैल खरेदीसाठी येतात़ यंदा पशुमेळा आणि यात्रा दोन्हीही न झाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे़ शुक्रवारी येथे पुन्हा बैल बाजार भरवण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असून त्यादृष्टीने तयारी सुरु असल्याची माहिती आहे़