शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मूर्ती उद्योगाला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शतकाची परंपरा असलेल्या नंदुरबार शहरातील गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे़ अद्याप उत्सवाला वेळ असला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शतकाची परंपरा असलेल्या नंदुरबार शहरातील गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे़ अद्याप उत्सवाला वेळ असला तरी मे महिन्यात सुरु होणारे गणेशमूर्ती तयार करणारे कारखानेही बंद असल्याने मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे़ तूर्तास शहरात तीनच ठिकाणी कारखाने सुरु असल्याची माहिती आहे़शाडू माती, पीओपी व सिरॅमिकसह काळ्या मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे नंदुरबार शहर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे़ गुजरात राज्यातील बहुसंख्य मंडळेही येथून मूर्ती घेऊन जातात़ मे महिन्यापासून शहरातील बहुसंख्य कारखाने सुरु होण्याची परंपरा आहे़ परंतू यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे कारखाने पूर्णपणे बंद आहेत़ यातून वार्षिक व्यवसाय असलेले मूर्तीकार घरी बसून आहेत़ मे व जून महिन्यात अनेक मंडळे येऊन मूर्तींची बुकींग करत असल्याने लहान आणि मोठ्या अशा दोन्ही मूर्तींच्या निर्मिती प्रक्रियेला वेग दिला जातो़ परंतू वाहतूक बंद असल्याने परजिल्ह्यातून मागवले जाणारे पीओपी, शाडू माती, रंग, सूत यासह मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा इतर कच्चा मालही मूर्तीकारांपर्यंत पोहोचू शकलेला नाही़ शहरात तब्बल १५० पेक्षा अधिक कारखाने आहेत़ दरवर्षी हे कारखाने किमान १ लाख मूर्तींची निर्मिती करतात़ यातून लाखो रुपयांची उलाढाल होते़ गेल्या काही वर्षात हा बाजार ग्लोब होऊन व्हॉटसअप किंवा इतर सोशल मिडियातून आॅनलाईन बुकींग करण्यात येते़ यंदा मात्र हे सर्वच शांत असून मूर्ती कारखान्यांवर गुजराण होणाऱ्या कुंभार समाज बांधवांसह कौशल्याने मूर्ती तयार करणाºया इतर कारागिरांवर संकट कोसळले आहे़दरम्यान शहरातील मंडळाकडूनही अद्याप यंदाच्या उत्सवाबाबत निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती आहे़ काही ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा होण्याची शक्यता असून यासाठी लहान मूर्तींनाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे़डिसेंबरपासूनच काम सुरु होते़ परंतू यंदा कोरोनामुळे ते काम बंद पडले आहे़ साहित्य नसल्याने शहरातील अनेक कारखाने बंद पडले आहेत़ लॉकडाऊन उघडताच मूर्ती तयार करण्यास सुरुवात करणाऱ-सुनील चौधरी, मूर्तीकार,नंदुरबाऱअद्याप कोणत्याही निर्णयावर चर्चा झालेली नाही़ येत्या काळात त्यावर निर्णय होईल़ परंतू कोरोनाचे भय कायम राहिल्यास उत्सव साधेपणानेच साजरे करण्यावर भर देऊ़-सुनील सोनार, पदाधिकारी, बाबा गणपती मंडळ, नंदुरबाऱ