शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन अधिकाऱ्याच्या संपर्कातील अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : मालेगाव येथील रहिवासी व सारंगखेडा येथील पशुधन विकास अधिकाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : मालेगाव येथील रहिवासी व सारंगखेडा येथील पशुधन विकास अधिकाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील दहापैकी चार जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री या चारही जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने सारंगखेडा ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सारंगखेडा येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कातील दोन सहायक पशुधन विकास अधिकारी व परिचर यांच्यासह दहा जणांना शहादा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.या दहा जणांपैकी चार जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यात परिचर, दोन्ही सहायक पशुधन विकास अधिकारी व एका महिलेचा समावेश होता. शुक्रवारी रात्री या चारही जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्याकडे प्राप्त झाली. हे अहवाल निगेटीव्ह आल्याने सारंगखेडा ग्रामस्थांनी नि:श्वास सोडला आहे.३० मे रोजी पशुधन विकास अधिकारी पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंततर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाची तारांबळ उडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून सारंगखेडा गावात तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मात्र त्यांच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे.३० मे रोजी संबंधित पशुधन विकास अधिकाºयाला आपला अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समजताच त्यांनी मोटारसायकलीने मालेगाव येथे जाऊन उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले. ही माहिती त्यांनी सहकाºयांना देताच त्यांच्या संपर्कातील सहकारी स्वत:हून शहादा येथील विलगीकरण कक्षात दाखल झाले. ही बाब आरोग्य विभागाने तातडीने सारंगखेडा ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने त्याचा उलगडा १ जून रोजी रात्री उशिरा झाला. त्यावरून या रुग्णाच्या संपर्कातील १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी तातडीने गावात बैठक घेऊन गाव तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.गावात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रांताधिकाºयांनी संबंधित पशुधन विकास अधिकाºयाच्या वरिष्ठांना पत्र देऊन कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून तूर्त चार जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.