शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरातील ते दारू दुकान अखेर केले ‘सील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

नवापूर शहरात रमजान ईद व अक्षय तृतीय दिवशी गांधी पुतळ्याजवळील एमडी वाइन शॉप सुरू असल्याचा व्हिडीओ भाजप तालुकाध्यक्ष भरत ...

नवापूर शहरात रमजान ईद व अक्षय तृतीय दिवशी गांधी पुतळ्याजवळील एमडी वाइन शॉप सुरू असल्याचा व्हिडीओ भाजप तालुकाध्यक्ष भरत माणिकराव गावीत यांनी व्हायरल केल्याने सोशल मीडियावर चांगला गाजला. त्या अनुषंगाने आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने वाइन शॉपवर तपासणी केली असता, वाइन शॉपचे रजिस्टर आढळून न आल्याने, तसेच मद्यविक्री करीत असल्याचे दिसून आल्याने वाइन शॉप जिल्हाधिकाऱ्यांचा पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आले आहे. याप्रसंगी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी उपस्थित होते.

एमडी वाइन शॉपचे संचालक बडोगे यांना या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी वाइन शॉपला होम डिलिव्हरी सुविधा देण्याचे आदेश दिले आहे. सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार्सल देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही मुख्य शटर बंद करून लहान शटर उघडे करून पार्सल देत होतो, त्या दरम्यान हा व्हिडीओ करण्यात आला आहे.

ही कारवाई नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक शैलेंद्र मराठे, बी.बी सूर्यवंशी, मनोज संबोधी, जमादार हितेश जेठे, हंसराज चौधरी, रामसिंग राजपुत, मानसिंग पाडवी यांनी केली.