शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी कायदेविषयक कार्यशाळा नंदुरबारात उपक्रम ; महिला समुपदेशन केंद्रातर्फे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:39 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग व जिल्हा महिला समुपदेशन केंद्रातर्फे महिलांसाठी कार्यशाळेचे ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग व जिल्हा महिला समुपदेशन केंद्रातर्फे महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव सतीश मलिये, महिला आर्थिक विकास महामंडळाचे तुषार पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सतीश मलिये यांनी सांगितले की, महिलांना कायद्याचे ज्ञान देणे आवश्यक आहे. आपल्या हक्कासाठी लढत असताना कुटुंबांची जबाबदारी, समाजात प्रतिष्ठेची वागणूक आणि अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र कार्यरत आहे. तेथून  कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी महिलांनी स्वबळावर प्रगती करावी, प्रत्येक महिलेला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ते मिळवण्यासाठी समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा, असे सांगितले. यशस्वीतेसाठी केंद्राच्या जिल्हा विधितज्ज्ञ ॲड. मंगला वसावे, जिल्हा समुपदेश ॲड. पूर्वीशा बागुल, सुमित्रा वसावे, ॲड. निशा पाडवी यांनी परिश्रम घेतले.