शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्वच राजकीय पक्षांचे नेते ‘क्वॅारंटाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:30 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक कुठलीही म्हणा, त्याच्या पूर्वसंध्येच्या राजकीय घडामोडींना खूप महत्व असते. मात्र, जिल्ह्यातील ...

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणूक कुठलीही म्हणा, त्याच्या पूर्वसंध्येच्या राजकीय घडामोडींना खूप महत्व असते. मात्र, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच सर्वच पक्षातील राजकीय नेते कोरोनामुळे ‘क्वॅारंटाईन’ असल्याने तो एक वेगळा चर्चेचा विषय ठरला आहे. नंदुरबार जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून त्यासाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या मतदानासाठी एक लाख १३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या आठवडा भरापासून निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराचा प्रचंड धुराळा सुरू होता. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये चुरस आहे. काही ठिकाणी भाऊबंदकीतच चुरस होत आहे. कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅाग्रेस, शिवसेना व भाजप या चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी या निवडणुकीसाठी प्रचाराची सांगता झाली. प्रचार संपला तसे निवडणुकीतील उमेदवार, गटनेते व प्रमुख कार्यकर्ता यांचे पावले नेत्यांच्या घराकडे वळली. मात्र सर्वच पक्षांचे नेते सद्या कोरोनामुळे क्वॅारंटाईन असल्याने महत्वाचे राजकीय डावपेच रचण्यासाठी नेत्यांच्या भरोवशावर असलेल्या उमेदवारांची व गटनेत्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली. जिल्ह्यातील नेत्यांपैकी आमदार डॅा.विजयकुमार गावीत व खासदार डॅा.हिना गावीत यांचा कोरोना चाचणी अहवाल कालच पॅाझिटिव्ह आला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांचाही अहवाल पॅाझिटिव्ह आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे हे देखील क्वॅारंटाईन आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या घरभरणीच्या कार्यक्रमात डॅा.हिना गावीत या उपस्थित होत्या. त्यामुळे ते देखील क्वॅारंटाईन आहेत. एकुणच सर्वच पक्षांचे प्रमुख नेते कोरोनामुळे रुग्णालयात व होम क्वॅारंटाईन आहेत. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी हे मंत्रालयीन कामासाठी मुंबईत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील कार्यकर्त्यांची मात्र नेत्यांशी प्रत्यक्ष भेट होणे अवघड झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी राजकीय स्थिती निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.