पातोंडा शिवारात गोडावून फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:18 IST2019-12-23T12:18:53+5:302019-12-23T12:18:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पातोंडा शिवारातील ट्रान्सपोर्ट कंपनीचे गोडावून फोडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार २० डिसेंबर ...

Late in the Patonda Shivar, lumps the issue of three and a half lakhs | पातोंडा शिवारात गोडावून फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

पातोंडा शिवारात गोडावून फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पातोंडा शिवारातील ट्रान्सपोर्ट कंपनीचे गोडावून फोडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार २० डिसेंबर रोजी उघडकीस आला होता़ याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पातोंडा शिवारात गिरनार कार्गो एस्कॉर्ट या ट्रान्सपोर्ट कंपनीचे गोडावून आहे़ गोडावूनच्या शटरचा पत्रा वाकवून १९ ते २० डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी आतील ३ लाख ५३ हजार ८१९ रुपयांचे साहित्य चोरीला गेले़ यात पावर केबल, सबमर्सिबल पंप, कपडे, गिफ्ट बॉक्स यासह विविध साहित्याचा समावेश आहे़
चोरीचा प्रकार समजून आल्यानंतर सत्यपाल साधूराम किनोनिया यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे करत आहेत़

Web Title: Late in the Patonda Shivar, lumps the issue of three and a half lakhs