शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात शेवटचा दिवस प्रचार फे-यांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील २२ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत बुधवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार फे-या रंगल्या होत्या. दिवसभरात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील २२ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत बुधवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार फे-या रंगल्या होत्या. दिवसभरात निवडणूक लढवणा-या दोन्ही पॅनलच्या फे-या निघाल्याने गावोगावी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील एकूण २७ पैकी सहा ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या होत्या. या सहा ग्रामपंचायतीतील २३ प्रभागांत बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. यामुळे शुक्रवारी २१ ग्रामपंचायतींच्या ६६ प्रभागांत निवडणूक कार्यक्रम होणार आहे. या ६६ प्रभागांमध्ये ४१ हजार ५७० मतदार मतदान करणार आहेत. या मतदारांकडून एकूण ४४९ उमेदवारांचा फैसला होणार आहे. दरम्यान बुधवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने असलाेद, सारंगखेडा, मोहिदे तर्फे शहादा, कुकावल, तोरखेडा, बामखेडा, फेस या गावांमध्ये प्रचार फे-या काढण्यात आल्या होत्या. या फे-यांमध्ये महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता. घरोघरी पुढे उमेदवार व मागे कार्यकर्ते असा लवाजमा दिसून आला. यात काहींचे ग्रामस्थांकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आल्याचेही चित्र यावेळी दिसून आले. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून गुरुवारी दुपारनंतर हे कर्मचारी २२ गावांकडे रवाना होणार आहेत. सोबत पोलीस कर्मचारीही रवाना होणार असून संवेदनशील मतदान केंद्रांसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

संक्रांतीचीही संधी  दरम्यान मतदान शुक्रवारी होणार आहे. गुरुवारी संक्रांती साजरी होणार आहे. सण साजरा होत असताना  तिळगूळ घ्या आणि मतदान करा असे साकडेच उमेदवार मतदारांना घालणार असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील काहींनी यासाठी विशेष लाडूही मागवून घेतल्याची माहिती आहे.