शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

लक्कडकोट वसाहत विजेअभावी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

लक्कडकोट ही नवीन वसाहत धारणाजवळ वसली आहे. या ठिकाणी साधारण ७० ते ८० कुटुंबे राहतात; परंतु सात वर्षांनंतरही येथे ...

लक्कडकोट ही नवीन वसाहत धारणाजवळ वसली आहे. या ठिकाणी साधारण ७० ते ८० कुटुंबे राहतात; परंतु सात वर्षांनंतरही येथे वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे गावठाणात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. हे गावठाण खर्डी खुर्द ग्रामपंचायतीत येते. येथून जवळच रोझवा लघुसिंचन प्रकल्प असल्यामुळे धरणातील पाणी पिण्यासाठी जंगली श्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे रहिवासीही जीव मुठीत घेऊन राहत आहेत. वास्तविक हे गावठाण सपाटीवर वसलेले आहे. लक्कडकोट गावात जागा उपलब्ध नसल्यामुळे ही कुटुंबे आपल्या शेतशिवारात कुडाची घरे करून राहत होते. तेथे सुविधा उपलब्ध होत नसल्याने ही कुटुंबे येथे धरणाजवळील सपाटीवर राहत आहेत. मात्र सुविधांबाबत सर्वांनीच त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गावठाणात विजेची सोय करावी यासाठी त्यांनी यापूर्वीही वीज वितरण कंपनीच्या तळोदा कार्यालयाकडे अर्ज केला होता. तथापि, तत्कालीन प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले नाही. त्यामुळे पुन्हा वसाहतीत विजेची सोय करून मिळावी यासाठी उपकार्यकारी अभियंता सुहास चहांदे यांची भेट घेतली. त्यांना ग्रामस्थांनी निवेदनही दिले आहे. लवकरात लवकर या गावठाणात वीजपुरवठा उपलब्ध करावा, अशी मागणी केली.

या निवेदनावर लक्कडकोट गावठाणातील बिरसा क्रांती दलाचे राजेंद्र पाडवी, संजय पाडवी, कुवरसिंग वळवी, सुरेश पाडवी, सुनील पाडवी, तापसिंग पाडवी, दिनेश वळवी, जालमसिंग पाडवी, राजू पडवी, आदींसह सर्व वसाहतधारकांच्या सह्या आहेत. दरम्यान, तळोदा वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता सुहास चहांदे यांनी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीचा ठराव करावा. जेणेकरून तातडीने कार्यवाही करता येईल. त्यामुळे ठराव आणण्याचे त्यांनी ग्रामस्थांना सूचित केले.

धरणाच्या पायथ्याशी वसाहत

लक्कडकोट येथील ग्रामस्थांची घरे ही पूर्वीपासूनच स्वतःच्या शेतात होती. प्रत्येकाची कुटुंब संख्या वाढल्याने शेतात घरेही वाढली. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने जमीन कमी होऊन उदरनिर्वाह करण्याइतकेही उत्पन्न येत नव्हते. त्यामुळे गेल्या सात-आठ वर्षापासून धरणाच्या पायथ्याशी लक्कडकोट ही नवीन वसाहत निर्माण केली आहे. सध्या त्या ठिकाणी ६० ते ७० घरांची वस्ती आहे. परंतु अद्यापही विजेची सोय नाही. त्यामुळे या समस्येबाबत ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.