तीन शिफ्टमध्ये सुरू झाली प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:40 IST2020-08-20T12:40:24+5:302020-08-20T12:40:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येथील प्रयोगशाळेत कोरोना तपासणीला गती देण्यात आली आहे. दिवसभरात २३० स्वॅब तपासणी करण्यात आली. ...

The laboratory started in three shifts | तीन शिफ्टमध्ये सुरू झाली प्रयोगशाळा

तीन शिफ्टमध्ये सुरू झाली प्रयोगशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : येथील प्रयोगशाळेत कोरोना तपासणीला गती देण्यात आली आहे. दिवसभरात २३० स्वॅब तपासणी करण्यात आली. स्वॅब तपासणीला गती देण्यात आल्याने वेटींग कमी झाली आहे.
नंदुरबारात अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. परंतु त्यात पुरेशा गतीने काम होत नसल्याची बातमी बुधवारी ‘लोकमत’ने प्रस्द्धि केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने लागलीच या ठिकाणी कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये ड्युटी लावली. त्यामुळे दिवसभरात २३० स्वॅब तपासण्यात आले. त्यामुळे स्वॅब अहवाल वेटींग कमी झाली आहे.
आता जवळपास ३०० अहवाल तपासणीचे बाकी आहेत. जे कोरोनाबाधीत येत आहेत त्यांच्या संपर्कातील लोकांचे देखील स्वॅब घेतले जात आहेत. दरम्यान, एकाच दिवसात १२८ बाधीत आढळून आल्याने खळबळ उडाली असून चिंतेचेही वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: The laboratory started in three shifts