शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलेश्वर अजुनही विकासाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : पर्यटनस्थळ व दोन राज्यातील भाविकांचे श्रद्धेचे कुंडलेश्वर हे निसर्गरम्य देवस्थान ईच्छागव्हाण ता. तळोदा ग्रुपग्रामपंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : पर्यटनस्थळ व दोन राज्यातील भाविकांचे श्रद्धेचे कुंडलेश्वर हे निसर्गरम्य देवस्थान ईच्छागव्हाण ता. तळोदा ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येते. या ठिंकाणी नेहमीच भाविकांची गर्दी होत असते. परंतु या ठिकाणाच्या विकासाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे ठिकाण अद्याप विकासाच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे.कुंडलेश्वर येथे नियोजित करण्यात आलेल्या योजना अपूर्ण असल्याने या स्थळाचा विकास होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मूलभूत सोयी-सुविधा अभावी पर्यटकही याकळे पाठ फिरवीत असल्याचे सांगण्यात येत आहे. कुंडलेश्वर हे तालुक्यातून जाणाऱ्या बºहाणपूर - अंकलेश्वर महामार्गाच्या उत्तरेस सातपुड्याच्या पायथ्याशी अक्कलकुवा तालुक्याच्या सीमेला लागून आहे. मोक्याचे ठिकाण असल्याने पर्यटकांची बºयापैकी गर्दी येथे असते.या ठिकाणी जाण्यासाठी महामार्गावरील शिर्वे गावावरून रस्त्याने जाता येते. येथे प्राचीन महादेव मंदिर, बारमाही वाहणारा गरम पाण्याचा झरा तसेच चोहोबाजुने वेढलेल्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या वृक्ष, वेली आहे. त्यामुळे येथे पर्यटक तसेच भाविकांचा ओढा मोठया संख्यने असतो. या ठिकाणी असलेले प्राचीन महादेव मंदिर व बारमाही गरम पाण्याचा झरा भविक व पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. त्यामुळे येथे जिल्ह्यासह शेजारील गुजरात व मद्यप्रदेशातील भाविक व पर्यटक शेकडोच्या संख्यने मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान व पूजा करण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे व्यवसायिक देखील येथे हजेरी लावीत असतात. दरवर्षी गदीर्चे प्रमाण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर येथे करण्यात आलेल्या सोयी - सुविधा नावालाच असल्याचे या ठिकाणी जाणाºया पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकामही अपूर्ण असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. दरम्यान स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी टाकीचे बांधकाम देखील अपूर्ण आहे.पर्यटकांना पाण्यासाठी इतरत्र शोधाशोध करण्यात येत आहे. त्यामुळे येथे पर्यटन विभागाने अधिक लक्ष दिल्यास, आहे त्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हे पर्यटनस्थळ भविष्यात समोर येऊ शकते, अशी अपेक्षा पर्यटकांकडुन करण्यात येत आहे.कुंडवा येथे प्राचीन महादेव मंदिर असलेल्या एका ठिकाणी संरक्षक कठड्याचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या कठड्यालाच संरक्षणाची गरज भासत आहे. हा कठडा जीर्ण झाला असल्याने त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या कठड्याचा आधार घेऊनच पर्यटक तथा भाविक मार्गक्रमण करीत असून हे कठडे भाविकांना धोकादायक ठरत आहे. यातून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याठिकाणी वर्षभर भाविक तसेच पर्यटक भेट देत असतात. परंतु पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याने येथे काही अंशी नाराजीचा सूर उमटू लागला आहे. येथे येण्यासाठी असलेल्या रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. वाहन चालविण्यासाठी ही वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.या परिसरात जाण्यासाठी असलेला सुमारे दोन किमीचा रस्ता अत्यंत खराब असून जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे येथे प्राथमिक सुविधा तरी प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.