शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशाच्या ‘भरत’ची फसवणूक करणारा सुलतानपुरचा ‘कृष्णकुमार’ अखेर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील प्रकाशा येथील एकास कर्ज देतो असे सांगून तब्बल सहा लाख रुपये लाटून ‘एैश’ ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील प्रकाशा येथील एकास कर्ज देतो असे सांगून तब्बल सहा लाख रुपये लाटून ‘एैश’ करणाऱ्या ठगाला शहादा पोलीसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली़ डिसेंबर २०१९ मध्ये हा प्रकार घडला होता़ शहादा पोलीसांनी आॅनलाईन पद्धतीने झालेल्या फसवणूकीचा छडा लावून संशयितास ताब्यात घेतले आहे़प्रकाशा येथील भरत रामदास चौधरी यांना नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ या दरम्यान एकाने फोन करुन फायनान्स कंपनीतून कर्ज देण्याच्या भूलथापा दिल्या होत्या़ त्याबदल्यात प्रोसेसिंग फीच्या नावाने त्याने चौधरी यांच्याकडून तब्बल ५ लाख ८४ हजार ८०३ रुपये बळकावले होते़ यानंतरही चौधरी यांना कर्ज न मिळाल्याने त्यांनी जानेवारी महिन्यात पोलीसात धाव घेतली होती़ या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करत होते़ दरम्यान चौधरी यांनी ज्या खात्यात पैसे वर्ग केले होते़ ते बँक खाते सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथील कृष्णकुमार याच्या नावे असल्याची माहिती समोर आली होती़ यानंतर आठ फेब्रुवारी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन, पोलीस कॉन्स्टेबल अनमोल राठोड यांच्या तपास पथकाने सुलतानपूर येथील बँकेत भेट देत पडताळणी केली असता, बँक खाते कृष्णकुमार यादव याच्या नावाने असल्याचे स्पष्ट झाले होते़ त्यानुसार कृष्णकुमार याचा पथकाने शोध घेतला असता तो, जुड्डुपुर जि़ सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथे असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्याला सापळा रचून पथकाने ताब्यात घेत, शहादा येथे आणले़ त्याला गुरुवारी शहादा न्यायालयात हजर करण्यात आले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किसन पाटील, उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यासह पथकाने केली़ दरम्यान ताब्यात घेण्यात आलेला कृष्णकुमार हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ त्याच्याकडून विविध राज्यात केलेले गुन्हे उघडकीस येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़