शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

मिरचीचे अभिनव प्रयोग राबवणारे कृषीभूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 12:00 PM

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नियोजनात्मक शेती केल्यास शेती आणि शेतकरी या दोघांनाही चांगलेच दिवस येतील, ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नियोजनात्मक शेती केल्यास शेती आणि शेतकरी या दोघांनाही चांगलेच दिवस येतील, फक्त मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे़ हे वाक्य आहेत बामडोद ता़नंदुरबार येथील शेतकरी दशरथ गरबड पाटील यांचे़ शासनाच्या कृषी भूषण पुरस्काराने गौरवल्या गेलेल्या दशरथ पाटील यांनी कमीत कमीत खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे विक्रमच केले आहेत़नंदुरबार तालुक्याच्या बामडोद या छोट्याशा गावात स्वत:च्या ३० एकर क्षेत्रात मिरची, पपई, केळी आणि टरबूज या पिकांची अभिनव पद्धतीने लागवड करुन अधिक उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे़ कमी पाणी आणि कमी खर्चात शेती कशी फुलवता येईल यासाठी सदैव प्रयत्न ते घेतात़ जास्तीत जास्त ठिबक सिंचनाने पाणी देऊन पिकांचे संगोपन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो़ पिकांना रासायनिक खतांचा तुटवडा कधीकाळी उद्भवणार म्हणून सेंद्रीय खते, गोमूत्र, निंबोणी अर्क, पंचामृत आदींचा वापर ते अधिक प्रकृर्षाने करतात़मिरची उत्पादनामुळे नावलौकिक प्राप्त झालेल्या कृषीभूषण दशरथ पाटील यांनी २००८ साली तीन एकर क्षेत्रात आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केली होती़ त्यासाठी ठिबक सिंचन व बेड पद्धतीचा वापर केला होता़ जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण प्रकल्प त्याकडे पाहिले जात होते़ दरम्यान एकरी ३५० क्विंटल उत्पादन त्यांनी काढले आहे़ त्यांची मिरची उत्पादनातील हा विक्रम पाहून राज्यातील किमान एक हजार शेतकऱ्यांनी बामडोद येथे भेट देऊन माहिती घेतली होती़नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या शेती प्रयोगांमुळे त्यांचा नावाचा लौकिक झाला आहे़ केळी, पपई, मिरची, टरबूज या पिकांच्या उत्पादनात वाढ करुन कमीत कमी जागेत, कमी खर्चात उत्पादन घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विविध भागातील अनेक शेतकऱ्यांना मार्ग सापडला आहे़ वर्षभर दशरथ पाटील मार्गदर्शनासाठीही शेतकºयांना भेटी देत असतात़