शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

कोरीट फाटा ते समशेरपूर कारखाना रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : कोळदा ते सेंधवा रस्ता रुंदीकरणादरम्यान कोरीट फाटा ते समशेरपूर कारखान्यापर्यंत काम अपूर्ण असल्याने येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : कोळदा ते सेंधवा रस्ता रुंदीकरणादरम्यान कोरीट फाटा ते समशेरपूर कारखान्यापर्यंत काम अपूर्ण असल्याने येथे रस्त्यावरच डबके साचून तलावाचे स्वरूप आल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेऊन मंगळवारपासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. पावसाळ्यात अपूर्ण काम असलेल्या ठिकाणी व पर्यायी रस्त्यांवर चिखल होत असल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल होतात. समशेरपूर कारखाना ते प्रकाशा गावापर्यंतचा मार्गही खडतर झाला आहे. तापी नदीवरील पुलावरही खड्डे पडले आहेत. पर्यायी रस्ते हे मातीचे असल्याने खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरुप आल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने काढावी लागतात. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची रस्ते विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता एन.के. बोरसे यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठेकेदाराला तंबी दिली व मंगळवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यास सांगितले. दोन जेसीबी मशीन लावून त्याठिकाणी कामाला सुरुवात केली आहे. पाऊस असल्याने डांबर टाकता येत नाही. म्हणून मुरूम टाकून खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता बोरसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.