केंद्र सरकारच्या योजना बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी किसान मोर्चा कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:32+5:302021-07-31T04:30:32+5:30

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात आले असून, या निमित्ताने गुरुवारी तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक ...

Kisan Morcha is committed to reach out to the Central Government's plans | केंद्र सरकारच्या योजना बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी किसान मोर्चा कटिबद्ध

केंद्र सरकारच्या योजना बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी किसान मोर्चा कटिबद्ध

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात आले असून, या निमित्ताने गुरुवारी तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सरचिटणीस सुधाकर भोयर, प्रदेश संघटक मकरंद कोरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वळवी, पंचायत समिती सदस्य विक्रम पाडवी, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, विजयसिंह राजपूत, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, संजय वाणी, ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, प्रवीणसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारमुळे केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास उशीर होत आहे. अनेक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. यासाठी आता आम्ही शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन जनजागृती मोहीम राबविणार आहोत. योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकरी सन्मान योजनेसह शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कसलीच मदत केली नाही उलट पीक विम्याचे निकष बदलून विमा कंपन्यांना मालामाल केले. खऱ्या अर्थाने राज्यातील ठाकरे सरकार शेतकरी हिताविरोधी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले. या मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश मराठे तर आभार पंचायत समिती सदस्य विजयसिंग राजपूत यांनी मानले.

Web Title: Kisan Morcha is committed to reach out to the Central Government's plans