शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या २० टक्के क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात मान्सूनने दिलेल्या समाधानकारक हजेरीमुळे शेतीकामांना वेग आला आहे़ यातून केवळ चार दिवसांत शेतकऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात मान्सूनने दिलेल्या समाधानकारक हजेरीमुळे शेतीकामांना वेग आला आहे़ यातून केवळ चार दिवसांत शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या २० टक्के निर्धारित पेरणी क्षेत्रात पीक पेरा पूर्ण केला असून येत्या आठवड्यापर्यंत ५० टक्के पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे़जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २ लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी करण्यात येते़ परंतू गेल्या वर्षात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे यंदा निर्धारित क्षेत्र हे २ लाख ९६ हजार २१९ हेक्टर ग्राह्य धरण्यात आले आहे़ ७ जूनपासून सुरु होणाºया पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला शेतकरी पहिल्या पावसानंतर सुरुवात करतात़ यंदाही पावसाने १२ जूनपासून दमदार हजेरी दिली असल्याने शेतशिवारात शेती कामांना वेग आला आहे़ जमिनीत ओलावा असल्याने सर्वच तालुक्यात तृणधान्य, तेलबिया आणि कडधान्य पिकांची पेरणी करण्यात वेग देण्यात येत आहे़ शेतकऱ्यांची सर्वाधिक भिस्त असलेल्या कापसाची लागवडही वेगात सुरु झाली असून सर्व सहा तालुक्यात १५ टक्के कापूस टोचणी पूर्ण झाली आहे़ जिल्ह्यात ३० जूनपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे़ यात तूर्तास पाच दिवस पाऊस ब्रेक देणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ यादरम्यानही हलक्या स्वरुपाचा पाऊस येण्याची शक्यता असून सोमवारनंतर पावसाचे दमदार आगमन होईल असे हवामान विभागाचे म्हणणे आहे़जिल्ह्यात यंदा २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणीचे नियोजन आहे़ पैकी ५९ हजार ३७८ हेक्टर क्षेत्रात गुरुवारपर्यंत पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक २३ हजार ६५, नवापुर ६ हजार ६६५, शहादा १९ हजार ५३५, तळोदा २ हजार १०७, धडगाव ३ हजार ६५२ तर अक्कलकुवा तालुक्यात ४ हजार ३३३ हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़खरीप हंगामात नगदी उत्पादन म्हणून शेतकरी कापसाला पसंती देतात़ गेल्या वर्षात कापूस उत्पादनाचे आकडे चढे राहिल्याने यंदा कापूस लागवड क्षेत्र वाढले आहे़ यंदा १ लाख ५६ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड होणार आहे़ यापैकी ३३ हजार ९४१ हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड पूर्ण झाली असून सर्वाधिक १७ हजार ३४० हेक्टर कापूस नंदुरबार तालुक्यात लागवड झाला आहे़ त्यानंतर १२ हजार ८५ हेक्टर कापूस शहादा तालुक्यात आहे़आजअखेरीस जिल्ह्यात भात २२१ हेक्टर, खरीप ज्वारी ५ हजार ७०४, बाजरी १ हजार ४१५, तूर १ हजार ७९८, मूग ६५८, उडीद ९३३, भूईमूग १३३, सूर्यफूल १११ तर सोयाबीन ५ हजार ८ हेक्टरवर पेरण्यात आला आहे़खरीप ज्वारी च्या उत्पादनात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे़ नंदुरबार २ हजार ३६०, नवापुर १ हजार ७, शहादा १ हजार ८७, तळोदा १३१, धडगाव ४०८ तर अक्कलकुवा तालुक्यात ६६० हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली आहे़ यंदा किमान ३५ हजार हजार ५१६ हेक्टरवर ज्वारीची पेरणी होणार आहे़शेतकºयांना गेल्या काही वर्षात बोगस बियाण्यांमुळे नापिकीला सामोरे जावे लागले होते़ यंदा कृषी विभागाने आधीच भरारी पथके निर्माण करुन विक्रेत्यांना सूचना केल्याने अद्याप बोगस बियाणे विक्रीचा प्रकार समोर आलेला नाही़ आधार देऊन खत देण्यात येत असल्याने अडचणी कमी झाल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़खरीप पिकांसोबतच ऊस लागवडीला वेग दिला जात आहे़ आतापर्यंत १ हजार ८१० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे़ यंदा १ लाख १७ हजार ३८ हेक्टर ऊस लागवड होण्याची शक्यता आहे़खरीप हंगामात धान्य, कडधान्य पिकांसोबत सोयाबीनला शेतकरी उत्पन्नाचे प्रमुख साधन पाहतात़ यातून आठवडाभरात ५ हजार हेक्टर सोयाबीन पेरला गेला असून यंदा २७ हजार हेक्टर सोयाबीन राहणार आहे़