जावदा त.बो. येथे व्यायामशाळेचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:52+5:302021-03-21T04:28:52+5:30

या वेळी आमदार राजेश पाडवी म्हणाले की, कोरोना काळात सुदृढ शरीर ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात व्यायाम खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. ...

Javada T.B. Inauguration of gymnasium here | जावदा त.बो. येथे व्यायामशाळेचे उद्‌घाटन

जावदा त.बो. येथे व्यायामशाळेचे उद्‌घाटन

या वेळी आमदार राजेश पाडवी म्हणाले की, कोरोना काळात सुदृढ शरीर ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात व्यायाम खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. गावातील तरुण मित्रांनी रोज व्यायाम करून निरोगी स्वास्थ्य ठेवावे. तसेच येणाऱ्या पोलीस भरती, स्पर्धा परीक्षेसाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. गावात काही अडचणी असतील तर माझ्याकडे संपर्क करा, मी त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल, असे सांगितले.

या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, माजी सभापती दरबारसिंग पवार, अदिवासी मोर्चाचे जिल्हा सचिव नारायण ठाकरे, जि.प. सदस्य योगेश पवार, अदिवासी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, संरपच आंबालाल पवार, विठ्ठलराव बागले, प्रवीण वळवी, दीपक ठाकरे, भगवानसिंग गिरासे, तुषार राजपूत, भैय्या गिरासे, संजयसिंग गिरासे, दिलवरसिंग गिरासे, विजय गिरासे, नरेंद्र गिरासे, विक्रम पाडवी, अजय पाडवी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Javada T.B. Inauguration of gymnasium here