शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

पोस यंत्राला ‘पोसणे’ झाले अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:56 IST

स्वस्तधान्य खरेदी-विक्रीत अडथळे : इंटरनेट कनेक्टीव्हीटी सुधारण्याची गरज

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रेशनमध्ये होणारा काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने स्वस्तधान्य दुकानदारांना ‘पोस’ मशिन पुरविली आह़े परंतु नेट कनेक्टीव्हीटीअभावी ही यंत्रे शोभेच्या वस्तू झाल्या असल्याची माहिती आह़े हे चित्र प्रकर्षाने तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये दिसून येत़े या यंत्रामुळे दुकानदारांबरोबरच ग्राहकदेखील हैराण झाले आह़े नेट कनेक्टीव्हीटीबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा       आह़ेरेशनच्या काळाबाजार थांबविण्याबरोबरच या ‘पोस’ प्रमाणालीत पारदर्शीपणा आणण्यासाठी राज्य शासनाने यंदापासून आधार ‘थम’ लागू केले आह़े यासाठी शासनामार्फतच संबंधित स्वस्त धान्य दुकानचालकांना ‘पोस’ मशिन पुरविली आहेत़ या यंत्रामुळे संबंधित लाभाथ्र्याच्या आधार नंबर शोधून यंत्रावर त्याचा ‘थम’ घेऊन त्यास धान्य वितरीत केले            जात़े तळोदा तालुक्यातही 91 गावे आणि 23 पाडय़ांसाठी 108 दुकानदारांना परवाना देण्यात आला आह़े यासाठी येथील पुरवठा शाखेकडून त्यांना साधारण 98 यंत्रे पुरविण्यात आली आहेत़ गेल्या जुलै महिन्यापासून ही यंत्रे दुकानदारांना देण्यात आली आहेत़़ तथापि ही प्रणाली दुकानदरांबरोबरच ग्राहकांसाठीदेखील  डोकेदुखी ठरत आह़े कारण धान्य वितरीत करताना सातत्याने नेट कनेक्टीव्हीटीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असत़े विशेषत सातपुडय़ातील अतिदुर्गम भागातील कोठार, पाढळपूर, खर्डी, बंधारा, राणीपूर, धनपूर, टाकली, जांबाई, धवळीविहीर, रापापूर,चौगाव, इच्छागव्हान, एकधड, वाल्हेरी, आंबागव्हान अशा 30 ते 35 गाव, पाडय़ांमध्ये ही अडचण मोठय़ा प्रमाणात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े अशा ठिकाणी हे ‘पोस’ यंत्रे कुचकामी ठरले आह़े अर्थात जुन्या पध्दतीने लाभाथ्र्याना धान्य वाटप केले जात आह़े पुरवठा विभागाने या दुकानदारांना यंत्रात टाकण्यासाठी  विविध कंपन्याचे सीमकार्ड दिले असले तरी त्या-त्या गावांमध्ये संबंधित कंपनीने टॉवर नसल्याने रेंज उपलब्ध होत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे          आह़े वास्तविक रेशनच्या काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने आधार थम प्रणाली वितरण व्यवस्थेत लागू केल्याने साहजिकच जनतेमध्येदेखील समाधान व्यक्त केले जात होत़े परंतु यात सातत्याने तांत्रिक बिघाड होत असल्याने यात बराच वेळ वाया जात आह़े या शिवाय तासन्तास रांगेतही तात्कळत उभे राहावे लागत असल्याची लाभाथ्र्याची व्यथा आह़े तालुक्यातील सपाटीवरील गावांमध्ये रेंज  कमी असल्याच्या अडचणी असल्या तरी तेथेही सततच्या खंडीत वीज पुरवठय़ामुळे बॅटरी चाज्रीगचा प्रश्न निर्माण होत असतो़ तसेच लाभाथ्र्याने जोराने अंगठा यंत्रावर दाबला तर दोन वेळा पावत्या यंत्रातून निघतात त्यामुळे दुकानदारदेखील हतबल झाले  आहेत़ ही पोस प्रणाली ग्रामीण भागात सुरळीत करण्यासाठी रेंज कनेक्टीव्हीटी बाबत ठोस उपाय योजना करण्याची गरज आह़े त्याभागात कोणत्या कंपनीची सेवा अधिक प्रभावी आहे या विषयी आपल्या यंत्रणेमार्फत सव्रेक्षण करुन त्या कंपनीचे सीम कार्ड संबंधित दुकानदारांना उपलब्ध करुन दिले पाहिज़े याउलट तिथे ज्यांची रेंज नाह असे सिमकार्ड दुकानदारांना देण्यात आले आह़े या शिवाय ग्रामीण भागात सातत्याने खंडीत होणा:या वीजपुरवठय़ाबाबतही प्रशासनाने    ठोस पावले उचलणे आवश्यक आह़े अन्यथा शासनाने कितीही चांगल्या योजना जनतेसाठी आणल्या मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसेल तर ती योजना कुचकामी ठरत़े त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली सुरळीत आणि पारदर्शी होण्यासाठी नेट कनेक्टीव्हीटी  प्रकरणी ठोस उपाय योजना  करण्याची जनतेची मागणी  आह़े