शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याबाहेर जाणारे व येणाऱ्यांसाठी दिशानिर्देश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून परराज्यात जाणारे, इतर जिल्ह्यातून व राज्यातून जिल्ह्यात येणाºया व्यक्तींबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातून परराज्यात जाणारे, इतर जिल्ह्यातून व राज्यातून जिल्ह्यात येणाºया व्यक्तींबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार परत ई पाससाठी अर्ज करता येणे नागरिकांना शक्य होणार आहे़जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातून मुळ गावी जावू इच्छिणाºया व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची माहिती त्या तालुक्यातील तहसीलदार एकत्रित करणार आहेत़ या माहितीत आधार, दूरध्वनी क्रमांक व पत्ता, ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्थळ आणि वाहनाच्या प्रकाराचा उल्लेख करावा लागणार आहे़ गटाच्या बाबतीत गटप्रमुख अर्ज करू शकतील. वैद्यकीय अधिकाºयाचे शीतज्वर नसल्याचे प्रमाणपत्र व्यक्तीनिहाय आवश्यक असेल. ई-पाससाठी http://covid-19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़या संपूर्ण प्रक्रियेसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नोडल अधिकारी राज्य आणि जिल्हानिहाय यादी तयार करून ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात जायचे आहे तेथील नोडल अधिकाºयासंोबत समन्वय साधणार आहेत़ स्वत:च्या वाहनाने जाणाºया व्यक्तींनाबाबत नोडल अधिकारी समन्वय साधून जाण्याची परवानगी देतील. वाहनासाठी परवाना तयार करून त्यावर प्रवासी व्यक्ती व मार्गाचा उल्लेख राहणार आहे़दरम्यान रेड झोनमधून नंदुरबार शहर किंवा जिल्ह्यात येणाºया व्यक्तीला परवानगी देण्यासंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यात येणाºया व्यक्तींना वैद्यकीय तपासणी करुन १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे़ बाहेरची वाहने चेकपोस्टजवळ आल्यानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहणार आहे़ परत येणाºयांनी रेड झोन किंवा प्रतिबंधित क्षेत्रात मुक्काम किंवा प्रवास करु नये असेही आदेशात म्हटले आहे़