कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:38+5:302021-04-03T04:26:38+5:30

तळोदा : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनातील शिक्षकांची सेवा अधिग्रहित केली असून, तशा आशयाचे ...

Instruction to Zilla Parishad Secondary Education Department to co-operate with the administration for corona prevention | कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला सूचना

कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला सूचना

तळोदा : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनातील शिक्षकांची सेवा अधिग्रहित केली असून, तशा आशयाचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत.

कोरोना महामारीचा संसर्ग प्रचंड वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने गेल्या २७ तारखेपासून जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, शासकीय, खाजगी अनुदानित आश्रशाळा बंद करण्यात केल्या आहेत. साहजिकच येथील कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रशासनाने कोरोना महामारीत प्रतिबंधासाठी प्रशासनास सहकार्य करण्याकरिता अधिग्रहित करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला दिली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळा प्रशासनास कर्मचाऱ्यांनी सेवा देण्यासाठी तातडीने उपस्थित राहण्याची सूचना देण्याचे आदेशित केले आहे. स्थानिक महसूल प्रशासनाकडून अथवा आपत्ती व्यवस्थापनातर्फे आपणास आदेश येतील. त्यामुळे आपण त्या अनुषंगाने कामे व कर्तव्ये पार पाडणे बंधनकारक राहील. यात कोणतीही टाळाटाळ, हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे पत्रात नमूद केले आहे.

सक्तीबाबत ज्येष्ठ शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर

कोरोना महामारीत सध्या शाळा बंद असल्यामुळे तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांची सेवा प्रशासनाने अधिग्रहित करण्याची सक्ती केली असली तरी यात सर्वच शिक्षकांना बंधनकारक केले आहे. मात्र, प्रशासनाच्या आदेशाबाबत ज्येष्ठ शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कारण, बहुसंख्य शाळांमध्ये ज्येष्ठ शिक्षक आहेत. शिवाय त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह अशी आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. एकीकडे शासनच म्हणते उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोनापासून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, नेमके प्रशासनाने कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित करताना वयाचा संदर्भ दिलेला नाही. त्यामुळे अशा शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्रशासनाने त्याबाबत फेरविचार करावा, अशी शिक्षकांची मागणी आहे.

Web Title: Instruction to Zilla Parishad Secondary Education Department to co-operate with the administration for corona prevention