शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातकडून येणाऱ्या वाळू वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गुजरात राज्यातून येणारी वाळू रॉयल्टीची आहे की नाही तसेच वाहनात भरण्यात आलेली वाळू ओव्हरलोड ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : गुजरात राज्यातून येणारी वाळू रॉयल्टीची आहे की नाही तसेच वाहनात भरण्यात आलेली वाळू ओव्हरलोड आहे का? याची तपासणी करण्यासाठी गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर नंदुरबार जिल्हा महसूल विभागाने पथक नेमले असून वाळूने भरलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.सविस्तर वृत्त असे की, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर महाराष्टÑात वाळू वाहतूक सुरू आहे. शिरपूर, नाशिक, मुंबई, ठाणे, मध्य प्रदेशातील पानसेमल, खेतिया, इंदूर आदी मोठ्या शहरांमध्ये दिवसभरात गुजरात राज्यातील तापी नदीतील सुमारे ३०० ट्रक भरुन वाळूची वाहतूक होत आहे. या वाळूची रॉयल्टी भरली आहे की नाही, रॉयल्टी ची पावती, त्याचा दिनांक व वेळ तसेच वाहनात भरलेली वाळू योग्य प्रमाणात भरली आहे की नाही हे सर्व तपासणीसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहाद्याचे प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिलेल्या आदेशान्वये शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी १२ पथके नेमली आहेत. प्रत्येक पथकाची वेगवेगळ्या दिवशी नेमणूक करण्यात येत आहे. त्यात महसूल, पोलीस व परिवहन विभागाचे अधिकारी आहेत. तळोदा चौफुलीवर हे पथक थांबून वाळूने भरलेल्या वाहनांची तपासणी करतात. अनाधिकृत वाळू वाहतूक व ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई या पथकांकडून करण्यात येत आहे. पथकात मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी, पोलीस गौतम बोराळे आदींचा समावेश आहे.गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होते. दिवसाला सुमारे २०० वाहने शहादा तर २०० वाहने नंदुरबारकडे जातात. बेफाम वेगाने जाणाऱ्या वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कोणाचाच वचक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पाणीमिश्रीत वाळू वाहून नेताना त्यातून निघणारे पाणी हे मागून येणाºया वाहनांवर उडत असते. दुचाकीस्वारांच्या अंगावर हवेने पाण्याचे शिंतोडे उडाल्याने अपघातही होतात. रात्री-अपरात्री ही वाहने वेगाने चालतात. बेशिस्तपणे वाळूची वाहतूक करणाºया वाहन चालकांवर परिवहन विभाग व पोलिसांनी जागोजागी थांबून दंडात्मक कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.