शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श प्रतिष्ठानच्या कुपोषणमुक्तीचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:55 IST

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शासनाची कोणतीही आर्थिक मदत किंवा निधी न घेता नंदुरबार जिल्ह्यात बालकुपोषण ...

सुनील सोमवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शासनाची कोणतीही आर्थिक मदत किंवा निधी न घेता नंदुरबार जिल्ह्यात बालकुपोषण निर्मूलनासाठी आदर्श प्रतिष्ठान शहादा ही संस्था गेल्या एका तपापासून कार्य करीत आहे. संस्थेच्या या स्पृहनीय कार्याची दखल घेऊन देश-विदेशातील सामाजिक संघटना व व्यक्तींनी आदर्श प्रतिष्ठानच्या कार्यात सहभाग नोंदवला आहे.शहादा येथे आदर्श प्रतिष्ठान शहादा ही संस्था २००६ साली स्थापन झाली. सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात या संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे. विशेषत: आरोग्य क्षेत्रात बालकुपोषण रोखण्यासाठी आदर्श प्रतिष्ठानचे कार्य मोलाचे आहे. नंदुरबार जिल्हा कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. आदर्श प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभरात ठिकठिकाणी मोफत रोगनिदान शिबिरे घेऊन कुपोषित बालकांचा शोध घेतला जातो. अशा सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील कुपोषित बालकांना संस्थेतर्फे मोफत औषधी, खेळणी व सकस आहाराचे वाटप करण्यात येते. अतिकुपोषित आणि तीव्र गंभीर आजारी असणाऱ्या बालकांना कुलकर्णी रुग्णालयात दाखल केले जाते. कुलकर्णी रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी १२ खाटांचे स्वतंत्र वार्ड असून या वार्डात कुपोषित बालकांवर मोफत औषधोपचार केले जातात. सर्व रुग्णांच्या रक्त व लघवी तपासण्या, एक्स-रे व गरज भासल्यास टू डी एको, रक्त, लघवीची तपासणी, सीटी स्कॅनही मोफत करण्यात येते. आवश्यकता भासल्यास मोफत रक्त पुरवठाही केला जातो. येथे दाखल झालेल्या बाळांना गहू, डाळ, शेंगदाणे, गूळ यापासून बनवलेला आहार देण्यात येतो. एवढेच नव्हे तर दवाखान्यातून सुटी झाल्यावरही सोया दूध पावडर व सुमारे महिनाभर पुरेल एवढा आहार पालकांना सोबत दिला जातो. जिल्ह्यातील बालकुपोषण रोखण्यासाठी आदर्श प्रतिष्ठान करीत असलेल्या या कार्याने प्रभावित होऊन शबरी सेवा समिती मुंबई, आय.आय.टी. पवई या संस्थाही या कार्यात आदर्श प्रतिष्ठानला सहकार्य करीत आहेत. शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता या संस्थेतर्फे डॉ.अलका कुलकर्णी व डॉ.मालविका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जिल्ह्यात ४१ आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात या शिबिरातून हजारो रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.संस्थेतर्फे २०१२ मध्ये हर्निया झालेल्या रुग्णांसाठी घेण्यात आलेल्या शिबिरात ६० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०१३ मध्ये झालेल्या शिबिरात ४४ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इंग्लंड येथील डॉ.अँन्ड्रयू किंग, जर्मनीचे डॉ. हॅन्स लायरल, अमेरिकेचे डॉ.अर्ल डेव्हीड व डॉ.सी. कार्बर यांनी शहाद्यात येऊन हर्निया शिबिरात रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या होत्या. डॉ.दर्शन कुलकर्णी व डॉ.शशांक कुलकर्णी यांच्याकडून शिबिरातील आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येतात. आरोग्य सेवेबरोबरच संस्थेतर्फे नाट्य प्रशिक्षण शिबिर, एकांकिका लेखन स्पर्धा, स्तनपान सप्ताह, विविध स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात येतात.आदर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शशांक कुलकर्णी असून उपाध्यक्ष डॉ.विश्वास पाटील, सचिव बन्सीलाल गगराणी, खजिनदार विवेक मंगेश पाटील, सदस्य हैदरअली नुरानी, डॉ.दर्शन कुलकर्णी, डॉ.अलका कुलकर्णी यांचा समावेश आहे.