शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने थंडावली उज्ज्वलाची शेगडी अन् घरातील सिलिंडर ठरतेय बेगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST

तालुक्यातील काकर्दे, शिंदगव्हाण यासह पूर्व भागातील अनेक गावांमध्ये उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर आणि शेगडी यांचे वाटप करण्यात आले आहे. यातून ...

तालुक्यातील काकर्दे, शिंदगव्हाण यासह पूर्व भागातील अनेक गावांमध्ये उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर आणि शेगडी यांचे वाटप करण्यात आले आहे. यातून धूरमुक्त स्वयंपाकघर अशी शासनाची योजना होती. परंतु गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात ठिकठिकाणी सिलिंडर आणि शेगड्या देण्यात आल्या. परंतु यानंतरही स्वयंपाक घरे धूरमुक्त नाहीत. यात दरवाढीमुळे हे सिलिंडर थेट बेगडी ठरत आहेत. या भेटीदरम्यान महिलांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत प्रतिसाद दिला.

कमाई आकडे कमी झाल्याने अडचणी

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतमजुरीवर चालतो. यात काही जण शहरात कामाला येतात. यातून तुटपुंजे उत्पन्न मिळते.

शेतात मजुरीचे दिवसाला १५० रुपये मिळतात. यातून किराणा मालाची खरेदी व इतर खर्च वजा जाता काहीच उरत नाही. अशा ८०० रुपयांचे सिलिंडर खरेदी करणे जमत नसल्याची माहिती गृहिणींकडून देण्यात आली.

दिवसभर शेतात कामाला जाते. परंतु रोज शेतात काम मिळेल असे नाही. यातून शेगडी आणि सिलिंडर मिळाले असले तरी ते भरण्यासाठी पैसे नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी सरपण गोळा करून आणतो. जुनाट लाकडे पडून आहेत. त्यांचाही वापर करण्यात येतो. यातून चुलीवर स्वयंपाक करते.

-महिला लाभार्थी,

काकर्दे ता.नंदुरबार.

सरपण गोळा करून चुलीवर स्वयंपाक करत आहे. उज्ज्वलाचे सिलिंडर मिळाल्याचा आनंद होता. परंतु नंतर ते भरण्यासाठी पैसे जमवणे अडचणीचे ठरत आहे. आता ८०० रुपयांपर्यंत सिलिंडर मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून चुलीवरच स्वयंपाक करण्यावर भर देत आहे.

-महिला लाभार्थी

काकर्दे ता. नंदुरबार. सिलिंडरच्या दरांमध्ये झालेली वाढ ही सर्वांनाच अडचणीची ठरली आहे. यातून घरातील खर्चात कपात करावी लागली आहे. ग्रामीण भागात सिलिंडरचा वापर हा फार कमी प्रमाणात करण्यात येतो. यातून गृहिणी ह्या बचतीवर भर देतात. आता सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वच ठिकाणी गॅसऐवजी सरपण घेऊन चूल पेटवली जात आहे.

- महिला लाभार्थी, वावद, ता. नंदुरबार. ,

ग्रामीण भागात पूर्वी सिलिंडरच्या गाड्या वेळेवर येत नव्हत्या. उज्ज्वलातून सिलिंडर दिल्यानंतर काहीवेळा गाड्या येत होत्या. तर कधी येतच नव्हत्या. आता महागाई झाल्याने अनेकांनी बुकिंग बंद केली आहे. परिणामी एक-दोन सिलिंडरसाठीही गाडी येत नाही. यामुळे बहुतांश महिला ह्या सरपणचा वापर करून स्वयंपाक करत आहेत.

-महिला लाभार्थी, शनिमांडळ, ता. नंदुरबार.

उज्ज्वला गॅस योजनेत शेगडी मिळाल्यानंतर बऱ्याच उशिराने सिलिंडर मिळाले, परंतु ते भरण्यासाठी पैसे जमत नसल्याने बऱ्याचवेळा ते रिकामे पडून राहते. दिवसातून १५० ते २०० रुपये मजुरीचे येतात. नवरा-बायको मिळून ४०० रुपये येत असले तरी घरातील खाणारी तोंडे आणि खर्च यातून पैसे उरणार तरी किती असा प्रश्न आहे.

-महिला लाभार्थी,

शनिमांडळ, ता. नंदुरबार