शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

यात्रेनिमित्त संसरोपयोगी साहित्य एका छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या सारंगखेडा यात्रेत ठिकठिकाणाहून भाविक येत असल्याने ही यात्रा सर्वच व्यापाऱ्यांना चांगले उत्पन्न ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या सारंगखेडा यात्रेत ठिकठिकाणाहून भाविक येत असल्याने ही यात्रा सर्वच व्यापाऱ्यांना चांगले उत्पन्न देणारी ठरते. त्यात संसारोपयोगी साहत्यांची मोठी खरेदी-विक्री होत असून विविध प्रकारची भांडे विक्रेते दाखल झाले आहे. त्यामुळे सर्व संसारोपयोगी साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे.सारंगखेडा यात्रेला चार दिवस झाले असून तेथे उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढत आहे. ही यात्रा केवळ दोन-चार दिवसाची नसून महिनाभर चालणारी यात्रा आहे. यात्रेसाठी केवळ महाराष्टÑातूनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक आले आहेत. महिनाभराच्या कालावधीत या यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे विविध वस्तु, साहित्य विक्रीसाठी व्यापारी दाखल झाले आहे. त्यात संसारोपयोगी साहित्य व मनोरंजानाच्या वस्तुंचा अधिक समावेश असल्याचे दिसून येत आहे.आधुनिकतेतही जातं वरवंटा शाबूतआधुनिकतेत नवनवीन संसारोपयोगी साहित्य निर्माण झाले असले तरी समाजाच्या काही घटकांकडून जातं, वरवंटा उखळ या पारंपरिक साधनांचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सारंगखेडा यात्रेत म्हसावद ता.पारोळा (जि.जळगाव) येथील महादू बारकू शिराळे हा व्यापारी त्यांच्या कुटुंबियांसह साहित्य विक्रीसाठी आला आहे.