धोबी व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:02+5:302021-05-24T04:29:02+5:30

निवेदनात, कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे धोबी व्यवसायाची अत्यंत खराब परिस्थिती झाली आहे. धोबी समाजातील बरेचसे नागरिक धोबी काम करून ...

Include the laundry business in essential services | धोबी व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा

धोबी व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा

निवेदनात, कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे धोबी व्यवसायाची अत्यंत खराब परिस्थिती झाली आहे. धोबी समाजातील बरेचसे नागरिक धोबी काम करून आपला उदरनिर्वाह चालवितात. अशातच कोरोनामुळे धोबी व्यवसायाला काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच बिकट व दयनीय झाली आहे. परीट धोबी समाज हा संत गाडगेबाबा अभियान व स्वच्छ भारत अभियान यात मोडत असतो. या समाजात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण खूप आहे. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी शासनाकडून मासिक भत्ता व विविध क्षेत्रात रिक्त पदांमध्ये जागा आरक्षित करण्यात यावी. धोबी समाजाला शासकीय योजनांचा मिळवून द्यावा. व धोबी व्यवसायाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून धोबी समाजाला आधार देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी परीट धोबी समाज संघटना, नंदुरबारतर्फे करण्यात आली आहे. प्रसंगी परीट धोबी समाज संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महेंद्र बोरसे, मुस्लीम धोबी समाज अध्यक्ष रहीम धोबी, माजी अध्यक्ष शफी धोबी, रहीम रफीक धोबी, रमेश धोबी, नवाज रफिक धोबी, लुकमान धोबी आदी उपस्थित होते.

Web Title: Include the laundry business in essential services