लोकसहभागातून उभारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या कोविड सेंटरचे तळोद्यात उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:32 AM2021-05-06T04:32:42+5:302021-05-06T04:32:42+5:30

तळोदा : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लोकसहभागातून येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचा शुभारंभ बुधवारी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात ...

Inauguration of the first Kovid Center in the district at Talodya | लोकसहभागातून उभारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या कोविड सेंटरचे तळोद्यात उद्‌घाटन

लोकसहभागातून उभारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या कोविड सेंटरचे तळोद्यात उद्‌घाटन

Next

तळोदा : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लोकसहभागातून येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचा शुभारंभ बुधवारी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. लोकसहभागातून उभारलेले जिल्ह्यातील हे पहिले रूग्णालय आहे.

दरम्यान, कार्यक्रमातच अनेक दात्यांनी आर्थिक मदत दिली होती. २५ ऑक्सिजनयुक्त बेडचे हे सेंटर आहे. कोरोना महामारीचा दिवसागणिक संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. उपचारासाठी नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. तरीही त्यांना खासगी अथवा सरकारी रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले आहे. यात तळोदा शहाराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे. ही हेळसांड थांबविण्यासाठी तळोदा नगर पालिका, आमदार राजेश पाडवी मित्रमंडळ व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शहरातील शासनाच्या येथील पशवैद्यकीय दवाखान्यात थाटण्यात आलेल्या या कोविड सेंटरचा शुभारंभ बुधवारी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. विविध सामाजिक संस्था, सहकारी बँका, विविध समाज व दात्यांची आर्थिक मदत आणि लोकसहभागातून या कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. साहजिकच येथे चांगल्या, उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कार्यक्रमातच अनेक दात्यांनी आर्थिक मदत केली होती. यावेळी तहसीलदार गिरीश वाखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, सभापती यशवंत ठाकरे, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, तालुका वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, डाॅ. विजय पाटील, डाॅ. शशिकांत वाणी, बळीराम पाडवी, जितेंद्र पाडवी, प्रकाश वळवी, शाम राजपूत, प्रवीणसिंह गिरासे, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, रामा ठाकरे, हेमलाल मगरे, योगेश पाडवी, अमानुद्दीन शेख, भास्कर मराठे, सुभाष चौधरी, कीर्तिकुमार शहा, गौतम जैन, आनंद सोनार, मौलाना शोएब रजा नूरी, निसार मक्राणी, शिरीष माळी, जालंधर भोई, नारायण ठाकरे, गुड्डू वळवी, किरण तडवी आदींसह नागरिक उपस्थित होते.

चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण

आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या निधीतून कोरोना रुग्णांसाठी चार रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे लोकार्पण देखील करण्यात आले आहे. दोन शहाद्यासाठी तर दोन तळोद्याकरिता आहेत. त्याचबरोबर त्यांनी तीन लाखांची ओपन जीम हातोड्या रस्त्यावर बसवून दिले आहे. त्याचेही उद्घाटन त्यांचा हस्ते करण्यात आले. शिवाय पालिकेतर्फे हातोड्या रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन त्यांचा हस्ते करण्यात आले.

Web Title: Inauguration of the first Kovid Center in the district at Talodya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.