शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात शिवजयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

ग्रामपंचायत, विसरवाडी विसरवाडी, ता.नवापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय व माणिकरावजी गावीत विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालयात ...

ग्रामपंचायत, विसरवाडी

विसरवाडी, ता.नवापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय व माणिकरावजी गावीत विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे सरपंच बकाराम गावीत व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ग्रामविस्तार अधिकारी कैलास सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख देवका पाडवी, गणेश चौधरी, प्रमोद वाघ, महेंद्र गावीत, राजू पाडवी, विनोद पगारे, कुणाल चौधरी, संदीप अग्रवाल, रईस शेख, सचिन तांबोळी, गणेश मेटकर, महेश अग्रवाल, जयेश अग्रवाल व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माणिकरावजी गावीत विद्यालयात प्राचार्य सुधाकर सोनार, पर्यवेक्षक एम.एस. वळवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी एन.बी. अहिररव, प्रकाश गावीत, नरेंद्र पगारे, एम.के. चव्हाण, वाय.एम. गावीत, सुरपा पाडवी, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी एम.एस. वळवी यांनी मनोगत व्यक्त केले.

छावा संघटना, तोरखेडा

तोरखेडा, ता.शहादा येथे छावा संघटनेद्वारे शिवजयंती मोठ्या उत्सावात साजरी करण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी जयसिंग गरूड, दीपक पवार, हर्षल जाधव, हरीश घोरपडे, राकेश जगताप, गणेश पवार, वैभव पवार, जितू पाटील, दादा पाटील, जीवन मराठे, अनिल कोळी, दिनेश ओगले यांनी परिश्रम घेतले