शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यातून अवैध लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  तालुक्यातील कोकणीपाडा गावात वन विभागाने छापा टाकून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  तालुक्यातील कोकणीपाडा गावात वन विभागाने छापा टाकून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित बोकरू रामसिंग कोकणी याच्याविरोधात वन गुन्हा दाखल आहे.कोकणीपाडा गावात लाकडाचा कारखाना सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. यानुसार गुरुवारी धुळे येथील दक्ष्ता विभागाचे विभागीय वन अधिकारी, नंदुरबार येथील सहायक वनसंरक्षक, शहादा, नवापूर, चिंचपाडा, धडगाव, बिलगाव, तोरणमाळ, काकर्दा येथील वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यावर छापा टाकला होता. यावेळी वनतस्कर बोकरू रामसिंग कोकणी याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली असता त्या ठिकाणी अवैधरित्या चालवण्यात येणारे रंधा मशीन आणि सागाचे लाकूड असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा जप्त केलेले लाकूड शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला. या गुन्ह्याबाबत चिचंपाडा वनरक्षक यांनी गुन्हा दाखल केला आहे. पथकाने या ठिकाणाहून २२० नग साग लाकूड, एक रंधा मशीन इलेक्ट्रिक मोटारसह तीन डिझाईन मशीन, इलेक्ट्रिक मोटार असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात असे अनेक अवैध लाकूड कटिंगचे कारखाने सुरू असल्याची माहिती समोर येत असल्याने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.