शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

१३ लाखाचे अवैध स्पिरीट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बनावट दारु निर्मितीसाठी धडगावकडे अवैध स्पिरीट घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांची दावळघाटात सापळा रचून तपासणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बनावट दारु निर्मितीसाठी धडगावकडे अवैध स्पिरीट घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांची दावळघाटात सापळा रचून तपासणी केली. त्यात दोन्ही वाहनांसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय वाहतुक करणाºया तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.शिरपूरहून धडगावकडे दोन वाहनांमध्ये स्पिरीट घेून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्री १० वाजेपासून धडगाव तालुक्यातील दावळघाट जवळ रस्त्यावर सापळा रचून धडगावकडे प्रत्येक वाहनांची तपासणी केली. त्यात पहाटे ५ वाजेच्या सुमाराम दोन वाहने भरधाव वेगात येत असल्याचे दिसून आले. या वाहनांना पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु हुलकावणी देत वाहन हाकण्याचाच प्रयत्न केला. दरम्यान सिनेस्टाईल दोन्ही वाहने थांबवून वाहनातील दिलीप लक्ष्मण पावरा, सिताराम लालसिंग पावरा रा. चोंदीपाडा ता. शिरपूर, प्रकाश वनसिंग पावरा यांना ताब्यात घेत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे यांची अधिक चौकशी करण्यात आली. त्यात तीन लाखाचे एक हजार ५०० लिटर स्पिरीट आढळून आले. त्यामुळे या तिघा संशयितांसह ११ लाख ५० हजाराची दोन बोलेरो वाहनेही ताब्यात घेण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, हे.कॉ. दीपक गोरे, विकास अजगे, प्रमोद सोनवणे, विजय ढिवरे यांनी केली.