शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शहरात चारचाकी वाहनासह एकाच्या घरातून अवैध मद्य जप्त करण्याची कारवाई पोलीसांकडून करण्यात आली़ शनिवार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : शहरात चारचाकी वाहनासह एकाच्या घरातून अवैध मद्य जप्त करण्याची कारवाई पोलीसांकडून करण्यात आली़ शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस पोलीस पथकाने ही कारवाई केली़धुळयाकडून जीजे २६ ए ६४०० या वाहनातून अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार शहरातील शांतीदूत पोलीस चौकी भागात पोलीस नाईक प्रविण मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अदिनाथ गोसावी, जयेश बाविस्कर, पंकज सूर्यवंशी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता़ परंतू ही गाडी न थांबता सरळ शहरात गेली होती़ पोलीसांनी पाठलग करुन गाडी थांबवून झडती घेतली असता त्यातून ७० हजार रुपये किमतीची बियर आढळून आली़ गाडीसह हा एकूण ३ लाख २० हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला़दरम्यान रविवारी दुपारी शहरातील दिनेश चौधरी याच्या घरात अवैध दारुचा साठा करुन करुन ठेवल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ यानुसार सहायक पोलीस निरीक्षक महाजन, सहायक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पवार, पोलीस कॉन्स्टेबल तनपुरे, बविस्कर, सुरेखा वळवी यांच्या पथकाने तेथे छापा टाकला होता़ यावेळी घरातून ५५ हजार ९१४ रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले़ दोघांवर नवापुर पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांच्या पथकाने कारवाई केली़