शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

नवापुराजवळ तीन रिक्षांमधून साडेचार लाखाचे अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापुर तालुक्यातून गुजरात राज्यात होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करीला रोखण्यात एलसबीच्या पथकाला यश आले असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापुर तालुक्यातून गुजरात राज्यात होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करीला रोखण्यात एलसबीच्या पथकाला यश आले असून वाकीपाडा ता़ नवापुर गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा साडेचार लाखाचे अवैध मद्य जप्त करण्यात आले़ तीन आॅटो रिक्षातून हा साठा ताब्यात घेण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्याच्या सिमेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या अंतर्गतच ही कारवाई करण्यात आली. नवापुर तालुक्यातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना मद्याचा पुरवठा होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी पथकासह मंगळवारी वाकीपाडा पुलाजवळ सापळा रचला होता़ दरम्यान नवापुरकडून गुजरात राज्यात ३ आॅटो रिक्षा भरधाव वेगाने जात असल्याचे पथकाला दिसून आले़ कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबण्याचे सांगितल्यानंतर रिक्षाचालकांना पळ काढला़पथकाने वाहनाद्वारे पाठलाग करुन रिक्षा थांबवल्या़ यावेळी रिक्षाचालकांची चौकशी केली असता, त्यांनी शोएब गुलाब बाबरिया, अकिल शेख महंमद आणि शेख साबीर शेख सत्तार अशी नावे सांगितली़ त्यांना वाहनातील मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली़ पोलीस पथकाने तपासणी केली असता, देशी विदेशी अवैध दारु व बियर मिळून आल्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले़रिक्षांमधून १ लाख २ हजार ३३६ रुपयांच्या देशी मद्याच्या १७६८ बाटल्या, ४६ हजार ३७६ रुपयांचे विदेशी मद्य, २६ हजार ४०० रुपयांचे बियरचे २१६ टीन, एक लाख ८५ हजार रुपयांच्या (जीजे २१ टी ४४०, जीजे १९ यू ७०७२, जीजे १९ यू ५७२९) या तीन रिक्षा असा एकूण चार लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र नगराळे, शांतीलाल पाटील, युवराज चव्हाण, जितेंंद्र तोरवणे, यशोदीप ओगले यांच्या पथकाने केली़