शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा तर रद्द केली, परीक्षा शुल्क कधी परत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत ...

नंदुरबार : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळण्याची आशा लागून आहे. २६ हजार २७२ विद्यार्थ्यांचे जवळपास १० लाख ९० हजार २८८ रुपये परीक्षा शुल्क परत द्यावे लागणार आहे. यासाठी शिक्षण विभागातर्फे आदेश येताच कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी दहावीचा भूगोलचा पेपर होऊ शकला नव्हता. त्यामुळे एकूण गुणांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण दिले गेले होते. यावर्षी तर संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये कही गम, तर कही खुशीची स्थिती आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कपोटी प्रत्येकी ४१५ रुपये जमा केले होते. आता परीक्षाच होणार नसल्यामुळे ते शुल्क परत करून कोरोना काळात विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. त्यानुसार आता शासनाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आदेश येताच विद्यार्थ्यांना ते शुल्क परत केेले जाणार आहे. परंतु, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाई झाल्यामुळे मंडळाचा खर्च झाला आहे. त्यामुळे निर्णय काय होते त्याकडे लक्ष लागून आहे.