शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

घोडेबाजार तीन दिवसातच एक कोटीच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला ११ डिसेंबरपासून प्रारंभ झाला होता़ १० दिवसांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला ११ डिसेंबरपासून प्रारंभ झाला होता़ १० दिवसांच्या यात्रोत्सवातील घोडेबाजारात अवघ्या तीनच दिवसात १ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे़ बाजारात यंदा दोन हजार घोड्यांची आवक झाली आहे़घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सांरगखेडा येथे सालाबादाप्रमाणे यंदाही चेतक फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे़ यांतर्गत शनिवारअखेरीस ५४ घोड्यांची विक्री करण्यात आली़ यातून २२ लाख ५२ हजार रुपयांची उलाढाल झाली़ या उलाढालीनंतर १ कोटी ९ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे़ बाजारात नुकरा जातीच्या घोड्यांची सर्वाधिक आवक झाली असून या घोड्यांच्या खरेदीसाठी देशभरातून खरेदीदार सध्या सारंगखेड्यात येत आहेत़ सायंकाळपर्यंत याठिकाणी १ कोटी ९ लाख २४ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली आहे़शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटीचे असल्याने राज्यासह देशातील विविध भागातून अश्वप्रेमी येथे दाखल झाले होते़ यात ६८ इंच उंची असलेला राजवीर, ६५ इंच उंचीचा बादल आणि ५० लाख रुपये किमत असलेला सुलतानची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक येथे हजेरी लावत होते़ दिवसभरात घोड्यांच्या शर्यतींनी रंगत आणली होती़५५ लाखाचा बादल वेधतोय लक्षसारंगखेडा येथील घोडेबाजार हा महागड्या अशा पंचकल्याणी घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे़ याठिकाणी भडगाव जि़ जळगाव येथील एका व्यापाऱ्याने ५५ लाख रुपये किमतीचा बादल हा घोडा विक्रीसाठी आणला आहे़ तब्बल ६५ इंच उंची असलेला हा घोडा सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे़ त्याची अद्याप खरेदी झालेली नाही़ परंतू त्याचा वेगळा आहार, नृत्य कौशल्य आणि धावण्याचे कसब पाहण्यासाठीच अश्वप्रेमी गर्दी करत आहेत़ त्याच्या ऊस्तादाकडून त्याची खास निगा राखली जात असल्याचे सांगण्यात आले़नुकरा घोड्यांना सर्वाधिक पसंतीसारंगखेड्याच्या घोडेबाजारात मारवाड, पंजाब, काठियावाडी या प्रजातीचे घोडे दाखल झाले आहेत़ तिन्ही प्रजातींच्या घोड्यांना खरेदीदारांची विशेष पसंती असते़ यातही पंजाब प्रांतातून येणाºया ‘नुकरा’ या घोड्याला विशेष मागणी असते़ याठिकाणी नुकरा घोडे घेण्यासाठी खरेदीदार हजेरी लावून त्याची खरेदी करतात़ बाजारात ६७ इंची उंची असलेला राजवीर या घोड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे़ मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील व्यापाºयाने विक्रीसाठी आणलेल्या या घोड्याला दररोज पाच लीटर दूध, दोन किलो चनाडाळ, अंडी असा आहार द्यावा लागतो़ घोड्याच्या देखभालीसाठी तब्बल आठ लोकांचे पथक असून त्यांच्याकडून त्याची निगा राखली जात आहे़ बाजारात खरेदीदारांपेक्षा पाहणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी होत असल्याचे चित्र आहे़ शनिवारी ६० हजार भाविक, पर्यटक यांनी सारंगखेडा यात्रोत्सवात हजेरी लावल्याची माहिती असून रविवारी ही संख्या लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे़