शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण विश्व कोरोनामुक्त व्हावा, अशी प्रार्थना करत पेटवली गेली काठीची राजवाडी होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

आदीवासींमध्ये होळी पूजन होत होऊन होळी पेटत नाही, तोपर्यंत पाळणी (नवस) धारकांच्या मनात होळी उत्सवविषयी श्रद्धाभाव ठेवून वर्षभर वावरत ...

आदीवासींमध्ये होळी पूजन होत होऊन होळी पेटत नाही, तोपर्यंत पाळणी (नवस) धारकांच्या मनात होळी उत्सवविषयी श्रद्धाभाव ठेवून वर्षभर वावरत असतो. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य होणार नाही आणि कुणाचेही मन दुखवणार नाही, याची काळजी घेत असतात. पाळणीला (नवस) प्रारंभ करतात तेव्हापासून पाळणी (नवस) पूर्ण होईपर्यंत ८ ते १० दिवस पायात चप्पल न घालणे, खाटेवर न बसणे, दिवसातून दोन वेळा नदीवर जाऊन आंघोळ करणे अशा अनेक गोष्टीचे काटेकोरपणे पालन पाळणी धारक करतात. श्रद्धा भाव ठेवून केलेला नवस बुधया बावा ढाणका ढोखो रूपात वेषभूषा परिधान करून निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाशी एकरूप होत पौर्णिमेचा चंद्राच्या प्रकाशात रात्रभर वातावरणात घुंगराचा आवाजात आणि डफाचा तालावर नाचताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत यंदाचा होलिकोत्सव साजरा केला.

दरवर्षी काठीच्या होलिका उत्सवात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक दूरदुरून येत होते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आदिवासींनी आपल्या भागात गावपाड्यात शांततामय वातावरणात साजरी केली. दरवर्षीचा तुलनेत यावर्षी उत्सवात भाविकांचे प्रमाण तुरळक होते. काठी संस्थानच्या कुटुंब तसेच ग्रामस्थांमध्ये होळी उत्सवाची उत्सुकता दिसून येत होती. कामानिमित्त स्थंलातर झालेल्या व होळी उत्सवाचे विक्रेत्यांना गावाकडे न येण्याचे आवाहन केल्याने गावपाड्याकडे कोणताही स्थंलातरित नागरिक, व्यावसायिक फिरकले नाही.

कोरोना महामारीचे संकट घालवण्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार गेल्या १५ दिवसांपासून मोलगी येथील सहायक निरीक्षक धनराज निळे यांनी केले असून. यांच्यासह महेश क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी. पोलीसपाटील रणजित पाडवी, सरपंच स्नेहा जितेंद्र पाडवी,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, सागर पाडवी, राजेन्द्र पाडवी, शेरसिंग पाडवी, करणसिंग पाडवी, गणपत पाडवी यांनी गावात बैठका घेऊन ग्रामस्थांशी विचार विनिमय करून सर्वांच्या मते साध्या पध्दतीने व विधीवत पूजा करून शांततामय वातावरणात यंदाचा होलिकोत्सव साजरा केला. अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील परिसरातील नागरिकांनी यंदा कोरोना प्रतिबधंक नियमांचे पालन करून होलिकोत्सव साजरा करण्यात आला. या होळी उत्सव गेल्या वर्षाप्रमाणे साजरा करता न आल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.