सरपंच निवडीच्या वादातून मारहाण

By Admin | Updated: April 29, 2017 15:42 IST2017-04-29T15:42:56+5:302017-04-29T15:42:56+5:30

जमावाने घरावरदेखील दगडफेक केली.

Hit by the promise of Sarpanch choice | सरपंच निवडीच्या वादातून मारहाण

सरपंच निवडीच्या वादातून मारहाण

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 29 - खेडले, ता.तळोदा येथे सरपंच निवडीच्या वादातून मारहाण होऊन दोनजण जखमी झाले. जमावाने घरावरदेखील दगडफेक केली. तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडले येथे कुवरसिंग रामसिंग नाईक व धमार धरमदास ठाकरे यांच्यात सरपंच पदाचा वाद होता. त्यावरून कुवरसिंग यांच्या घरावर जमावाने चाल करीत मारहाण केली. लाठय़ा, काठय़ा, लोखंडी सळई, दगडांचा वापर करण्यात आला. त्यात सोनाली दिलीप ठाकरे ही बालिका व देविदास गरबड ठाकरे हे जखमी झाले.  घरावर दगडफेक करून घराचे व दुचाकीचेही नुकसान केले. याबाबत कुवरसिंग नाईक यांनी फिर्याद दिल्याने धर्मा धरमदास ठाकरे, विकास धरमदास ठाकरे, धरमदास तुकाराम ठाकरे, गुलाब वेडू ठाकरे, प्रदीप गुलाब ठाकरे, कृष्णा गुलाब ठाकरे, आत्माराम वेडू ठाकरे, भावराव बाबू बागुल यांच्याविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Hit by the promise of Sarpanch choice