शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील वाहतूक चार दिवसात सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : रहदारी पूर्णपणे बंद झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रहदारी येत्या तीन ते चार दिवसात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : रहदारी पूर्णपणे बंद झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रहदारी येत्या तीन ते चार दिवसात सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांनी भेट दिल्यानंतर हा निर्णय जाहीर केला.गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायंगण शिवारात  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ब्रिटीश कालीन फरशी तुटल्याने महामार्ग पूर्णत: बंद झाला. ही घटना घडून सहा दिवस झाले असतांना पर्यायी व्यवस्था होत नसल्याचे पाहून चिंचपाडा येथील मनिष ओमप्रकाश अग्रवाल व सहकारी यांनी बुधवारी स्वखर्चाने पुलाचे काम करण्याचा बेत आखला व प्रत्यक्ष कामास सुरूवातही केली. क्षतिग्रस्त पुलाच्या शेजारी असलेल्या जुन्या मार्गालगत पाईप टाकून त्यावर मुरूमाचा भराव करुन लहान तीन व चारचाकी वाहनांची ये जा मंगळवारी सायंकाळ पासून सुरू झाली आहे. बुधवारी दुपारी पुलाच्या उभारणीच्या विचाराने सुरू झालेल्या कामाची चर्चा सोशल मिडीयावर तयार करण्यात आलेल्या एका समुहावर सार्वजनिक करण्यात        आली. कामासाठी लोकसहभागाचा पर्याय देण्यात आला. सीमा परिवहन तपासणी नाक्यावरील अधिकारी व काही व्यापारी तथा व्यावसायिकांनी त्यास सहमती दर्शविल्यावर प्रत्यक्ष कामही सुरू झाले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांना ही बाब समजल्यावर त्यांनी  सायंकाळी पाच वाजता घटनास्थळी भेट दिली. महामार्गावर नवीन पुलाच्या उभारणीसाठी 16 रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून, येत्या एक महिन्याच्या कालावधीत युध्दस्तरावर पुलाची उभारणी करण्यात येणार आहे, असे महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, तांत्रिक व्यवस्थापक रवींद्र इंगोले यांनी सांगितले. 16 ऑगस्ट पासून पुलाच्या समांतर मुरूमाचा भराव करून वळण रस्ता उभारून येत्या चार दिवसात महामार्गावरील रहदारी पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची दुरवस्था झालेली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी या प्रश्नावर गंभीर नसल्याने दिवसागणिक महामार्गाची दैना होत आहे. पावसाळ्याचेनिमित्त करून महामार्ग दुरुस्ती लांबणीवर टाकली जात आहे. वस्तुस्थितीनुसार गेल्या कित्येक महिन्यांपासून महामार्गावर मोठय़ा खड्डय़ांची दुरूस्ती न करण्यात आल्याने महामार्गाचा वापर करणारे प्रवासी, महामार्गालगत असलेले हॉटेल व इतर व्यावसायिक, पेट्रोल पंप मालक, वाहनधारक हाल अपेष्टा सोसत आहेत. फक्त अधिका:यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याचा आरोप होत आहे.  अधिका:यांनी पळून न जाता महामार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घ्यावे यासाठी सर्वानी एकत्रित येऊन प्रय} करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्या नंदुरबार येथील प्रस्तावित भेटीत हा प्रश्न चर्चीला जावा यासाठी प्रय} होत असतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांच्या बुधवारच्या भेटीत ठोस आश्वासन मिळाल्याने काम सुरू होण्याची अपेक्षा वाढीस आली आहे. अधिका:यांनी रायंगण येथून बेडकी पावेतो रस्त्याची पाहणी करून खड्डे दुरूस्तीसाठी नेमके काय व  कसे करावे लागेल याची पाहणी  केली.