शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात आरोग्यवर्धक रानभाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चवदारच नव्हे तर औषधी गुणधर्माच्या पौष्टिक रानभाज्या सातपुड्यात मिळत आहे. त्या रानावनात उगलेल्या असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चवदारच नव्हे तर औषधी गुणधर्माच्या पौष्टिक रानभाज्या सातपुड्यात मिळत आहे. त्या रानावनात उगलेल्या असल्याने धडगाव व मोलगी भागात अगदी निशुल्क उपलब्ध होत आहे. निशुल्क मिळत असल्याने या भाज्यांची खरी किंमत कळत नाही, परंतु त्या अनेक आजारांवर उपायकारक आहे. या भाज्यांची प्रशासकीय पातळीवर विकासाच्या दिशेने दखल घेणे अपेक्षीत आहे.सातपुड्यात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, झुडूपे आढळून येतात, त्यापैकी बहुतांश वनस्पतींचा पाला, फुले, फळे यांचा खाद्यान्न म्हणून वापर होत आहे. या खाद्यान्नाचा आदिवासींमधील विविध मौखिक साहित्यांमध्ये उल्लेख होतांना दिसत आहे. प्रामुख्याने डाब राजमंडलच्या कहाण्या, गितांसह पारंपरिक लग्नगिते, होळी गीतांमध्येही होत आहे. या भाज्यांचा पिढ्यानपिढ्यान अन्न म्हणून अवलंब केला जात आहे. त्यामुळे या भाज्यांचा शोध आदिवासींच्या पूर्वजांनीच लावला असावा, हे सिद्ध होत आहे. सुरुवातीला मानव अन्न हे जंगल व आसपासच्या परिसरातून मिळत असे. यात कंदमुळे, जंगलातून अपोआप मिळणारी फळे व रानभाज्यांचा समावेश होतो. माणसाने शेती करायला सुरुवात केली, त्याच्या खान-पानाच्या सवयी बदलल्याचे दिसून येत आहे.शहरी भागात कृषीव्यवस्थेच्या बदलामुळे कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची अशा भाज्या मिळत असल्या तरी सातपुड्यातील आदिवासी बांधव ऋतू व काळानुरुप पोवाळ्या (सनाय), माटला, उखीवळा, आंबाडा, शेल्टा, शेवगा पाला, उंबरपाला, सिंचपाला, मोखं, सिरीवाटा यासह अनेक वनस्पतींचा पाला, फुले, मुळे व फळे दैनंदिन आहारातील खाद्यान्न म्हणून वापर करीत आहे. या भाज्यांसाठी धडगाव मोलगी भागात सहज मिळत असून त्यासाठी आदिवासी बांधवांना कुठलीही किंमत मोजावी लागत नाही. त्यात कंदवर्गीय, झुडूपवर्गीय, वेलवर्गीय, वृक्षवर्गीयांसह आळंबीही उपलब्ध होते. परंतु आळंबी काही अंशी कालबाह्य देखील ठरत आहे. या भाज्यांच्या विकासासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे.रानभाज्यांचा प्रशासकीय पातळीवर दखल घेत त्यातील औषधी गुणधर्म पडताळून पाहणे गरजेचे आहे. रानभाज्या या ठराविक मातीत व वातावरणातच उपलब्ध होतात. त्यामुळेया नैसर्गिक संपत्तीतील जैवविविधता ओरबाडली जाणार नाही, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे. या भाज्या रानभाज्या असल्या तरी त्यांचीही शेती करता येऊ शकते का? या दिशेने प्रशासनाचे पाऊल पडल्यास या भाज्या निश्चितच विकासाच्या वाटेवर येतील पर्यायाने प्रत्येक घटकातील बांधवांना पौष्टीक तथा औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या उपलब्ध होतील. त्यातून आरोग्यदायी समाज निर्माण होईल. शिवाय दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना त्यातून रोजगार देखील उपलब्ध होऊ शकेल.काही भाज्या शेतात नव्हे जंगलातच वाढतातसातपुड्यात आढळून येणाऱ्या वनस्पतींपैकी बहुतांश वनस्पती या रानातच वाढतात. त्याची शेती केल्यास किंवा त्याची बागेत लागवड केल्यास त्या वाढत नाही. त्यामुळे सातपुड्यातील आदिवासी बांधव काही भाज्यांचा साठा करीत नाही. किंवा त्यांच्या बियाही साठवून ठेवत नाही. प्रशासकीय पातळीवर या भाज्यांचा विकास करतांना अशा काही भाज्यांचीही निवड होणे काळाची गरज आहे.