शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

तोरखेड्यात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कतोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करुन उपाययोजनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तोरखेडा येथील महिला धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना कोरोना बाधीत आढळल्यानंतर गावात विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर या महिलेच्या अतिसंपर्कातील १३ जणांना दोन टप्प्यात शहादा येथील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. पैकी १ जुलै रोजी वृद्धाचे नंदुरबार येथे निधन झाले. मात्र अहवाल येणे बाकी असल्याने त्यांच्यावर कोवीड-१९ च्या नियमानुसार अंत्यसंस्कार पार पडले. ५ जून रोजी मयत वृद्धासह सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. सोमवारी गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, ग्रामविस्तार अधिकारी बी.एस. सूर्यवंशी, ग्रामसेवक चेतन पाटील, ग्रामपंचायत पदधिकारी, पं.स.चे माजी सदस्य प्रियदर्शन कदमबांडे व आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. गोसावी यांनी उपाययोजना व आरोग्याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी हिंगणी येथेही भेट दिली. गावात पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय मोहने, डॉ.गोपाल भारुडे, डॉ.विजय पावरा, आरोग्य सहायक एस.एच. सावडे, आशा कार्यकर्ती सरला शिंदे, अंगणवाडी सेविका रत्ना चौधरी, पोलीस पाटील दयाराम चौधरी, मंडळ अधिकारी विजय साळवे, तलाठी शशिकांत सावळे, कोतवाल प्रवीण मोरे आदी गावात तळ ठोकून आहेत. तोरखेडा येथे पुन्हा पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.