अवैध संबंधाचा पतीला जाब विचारल्याने पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:51+5:302021-02-12T04:29:51+5:30

नंदुरबार : पतीच्या अवैध संबंधाविषयी जाब विचारल्याच्या कारणातून पत्नीचा छळ केल्याची घटना निझर (गुजरात) येथे घडली, पती व त्याच्या ...

Harassment of wife by asking husband to answer for illicit relationship | अवैध संबंधाचा पतीला जाब विचारल्याने पत्नीचा छळ

अवैध संबंधाचा पतीला जाब विचारल्याने पत्नीचा छळ

नंदुरबार : पतीच्या अवैध संबंधाविषयी जाब विचारल्याच्या कारणातून पत्नीचा छळ केल्याची घटना निझर (गुजरात) येथे घडली, पती व त्याच्या प्रेयसीसह चार जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनराज भगवान पटेल या युवकाचा नंदुरबारातील प्रियंका पटेल यांच्याशी विवाह झाला होता. परंतु पती धनराज हे दीपाली नामक महिलेशी अवैध संबध ठेवून असल्याचे व ते वारंवार त्या महिलेला भेटत असल्याची बाब प्रियंका यांना माहिती झाली. त्यामुळे त्यांनी पतीला याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. त्याचा राग येऊन पतीसह सासरची मंडळी प्रियंका यांना त्रास देऊ लागली. माहेरून १५ लाख रुपये आणावे असे कारण देत छळ केला जाऊ लागला. पैसे आणत नाही म्हणून घरातून काढून दिले. पुन्हा नांदण्यास गेली असता मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.

या छळाला कंटाळून प्रियंका यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून धनराज भगवान पटेल, सुनीता भगवान पटेल, कौशल्या पंकज पटेल व संबंधित महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पितांबर जगदाळे करीत आहेत.

Web Title: Harassment of wife by asking husband to answer for illicit relationship