लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिरुड दिगर ता़ शहादा येथील माहेर तर दोंडाईचा येथील सासर असलेल्या विवाहितेचा सासरच्यांनी रिक्षा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये आणावेत यासाठी छळ केला़ आॅगस्ट २०१८ ते आॅगस्ट २०१९ या दरम्यान हा प्रकार घडला़अश्विनी संजय निकुंबे असे विवाहितेचे नाव असून त्यांचा पती मेघराज धनराज नगराळे, सासू लताबाई, जेठ युवराज, जेठाणी वैशाली व दीर शिवराज नगराळे यांनी वेळोवेळी शारिरिक व मानसिक त्रास देत छळ केला होता़ अश्विनी यांनी माहेरुन रिक्षा घेण्यासाठी १ लाख रुपये आणावेत अन्यथा नांदवणार नाहीत अशी धमकी दिली होती़ याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व पाच संशयितांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}