शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

्नराज्यपालांसाठी अर्धेच केले काम उर्वरित रस्त्यालाच केला ‘रामराम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा दौऱ्यावर येऊन परत जाणाºया राज्यपालांना महामार्गावर खड्ड्यांची झळ बसू नये म्हणून बांधकाम विभागाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा दौऱ्यावर येऊन परत जाणाºया राज्यपालांना महामार्गावर खड्ड्यांची झळ बसू नये म्हणून बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने नंदुरबार ते खांडबारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर केवळ पाच किलोमीटर रस्त्याचे अर्धेच डांबरीकरण करत उर्वरित रस्त्याला ‘रामराम’ केल्याचा हास्यास्पद प्रकार समोर आला आहे़ हे पाच किलोमीटर डांबरीकरण सोयीचे ठरण्याऐवजी त्रासदायकच ठरत असल्याने नाराजीही व्यक्त होत आहे़राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २० आणि २१ फेब्रुवारी जिल्हा दौºयावर येऊन गेले़ हेलिकॉप्टरने आलेले राज्यपाल हेलिकॉप्टरनेच जाणार असले तरी त्यांचा नंदुरबार येथून ते नवापुर तालुक्यात जाणार होते़ या यासाठी खांडबारा ते भादवड दरम्यान पाच किलोमीटर महामार्गाचे एका रात्रीतून डांबरीकरण करण्यात आले होते़ तातडीने करण्यात आलेल्या या कामातून राज्यपालांना विकास जाणवला पाहिजे असा प्रयत्न करण्यात आला की काय अशी चर्चा सुरु आहे़ महामार्ग प्राधिकरणने संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्याची अपेक्षा असताना केवळ एकाच बाजून ठिगळ लावल्यागत डांबरीकरण करुन वेळ मारुन नेल्याने आता मार्गावरुन जाणाऱ्यांना अडचणी येत आहे़ राज्यपाल या मार्गाने जाणार असल्याने केवळ रस्त्याचा तेवढाच भाग पूर्ण करण्यात आला़ या अत्यंत तकलादू डांबरीकरण केले असल्याने सुविधेऐवजी वाहनधारकांना असुविधा अधिक होत असल्याचे चित्र आहे़विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाची उभारणी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्ग प्राधिकरण ही विंग उभारुन त्याकडे हे काम सोपवले आहे़ यातून रस्ता नंदुरबार जिल्ह्यातील असला तरी महामार्गाचे कार्यालय मात्र धुळ्यात आहे़ त्याठिकाणी कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी आहेत़ परंतू ते इकडे फिरकतही नसल्याने रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत़ राज्यपालांच्या वाहनांचा ताफा जाईल तेवढ्याच बाजूने रस्ता तयार करुन लाखो रुपयांची बिले लाटणाºया संबधित अधिकाºयांसह ठेकेदारावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़