अक्कलकुवा येथे ३९ हजार रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST2021-03-13T04:55:29+5:302021-03-13T04:55:29+5:30

नंदुरबार : अक्कलकुवा येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने ३९ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ...

Gutka worth Rs 39,000 seized at Akkalkuwa | अक्कलकुवा येथे ३९ हजार रुपयांचा गुटखा जप्त

अक्कलकुवा येथे ३९ हजार रुपयांचा गुटखा जप्त

नंदुरबार : अक्कलकुवा येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने ३९ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश परमसुख तवंर, रा.मोठी गल्ली, अक्कलकुवा असे गुन्हा दाखल झालेल्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा येथील मोठी गल्ली भागातील गोपाला प्रोव्हिजन या दुकानात गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी या दुकानात तपासणी केली असता तेथे ३३ हजार रुपये किमतीचे विमल पानमसाला व १२ सुगंधीत तंबाखूचे पाऊच तसेच सहा हजार रुपये किमतीचे स्वीट सुपारीचे पाऊच असा एकूण ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत दिनेश ज्ञानेश्वर तांबोळी यांनी फिर्याद दिल्याने सुरेश परमसुख तवंर यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुरेश चौधरी करीत आहे.

Web Title: Gutka worth Rs 39,000 seized at Akkalkuwa