बालशहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:02 PM2019-09-10T12:02:05+5:302019-09-10T12:02:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणा:या बालशहिदांना सोमवारी विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात आले. माणिक चौकातील शहिद ...

Greetings to the child martyr | बालशहिदांना अभिवादन

बालशहिदांना अभिवादन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणा:या बालशहिदांना सोमवारी विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात आले. माणिक चौकातील शहिद स्मारकाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. यानिमित्त व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. 
1942 च्या स्वातंत्र्य लढय़ाच्या वेळी नंदुरबारात देखील देशाच्या स्वातंत्र्यांसाठी विविध माध्यमातून आंदोलने केली जात होती. 9 सप्टेंबर 1942 रोजी इंग्रज पोलीस अधिका:यांनी बालकांवर गोळीबार केला होता. त्यात शिरिषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे साथीदार लालदास बुलाखीदास शाह, धनसुखलाल गोवर्धनदास वाणी, शशिधर निळकंठ केतकर व घनश्याम गुलाबचंद शहा ही बालके शहिद झाले होते. तेंव्हापासून 9 सप्टेंबर हा दिवस शहिद दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त माणिक चौकातील शहिद स्मारकाला अभिवादन केले जाते. व्याख्यानासह इतर विविध उपक्रम येथे आयोजित केले जातात.
सकाळी आठ वाजता शहिद स्मारक समितीतर्फे येथे अभिवादन कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्यासह समितीचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
दिवसभर स्मारकाला विविध मान्यवर व्यक्ती, विद्यार्थी यांनी येवून पुष्पचक्रम अर्पण करीत अभिवादन केले. नऊ वाजता शहिद स्मारक समितीतर्फे टिळक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 
प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार जे. यू. ठाकरे, प्रा. डॉ. शरद जावडेकर, अजित घाटगे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहिद स्मृतीचे अध्यक्ष अॅड. रमणलाल शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा र}ा रघुवंशी  होत्या.     
 

Web Title: Greetings to the child martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.